Kamal Nath, Shivraj Singh Chauhan News Sarkarnama
देश

Madhya Pradesh Survey : मध्य प्रदेशात काँग्रेस की भाजपा? सर्व्हेतून मोठी आकडेवारी समोर

Madhya Pradesh News : मध्य प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीसाठी काही दिवसांचाच अवधी शिल्लक आहे.

सरकारनामा ब्यूरो

Madhya Pradesh Politics News : मध्य प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीसाठी काही दिवसांचाच अवधी शिल्लक आहे. या निवडणुकीसाठी भाजपा आणि काँग्रेससह इतर पक्षांनीदेखील तयारी सुरू केली आहे. मध्य प्रदेश सत्तेत येण्यासाठी भाजपा आणि काँग्रेसकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे.

मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) निवडणुकीच्या संदर्भात एबीपी आणि सी व्होटरने सर्व्हे केला आहे. या सर्व्हेतून काही रोचक तथ्य समोर आली आहे. मध्य प्रदेशमध्ये या वर्षाच्या अखेरपर्यंत विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. मध्य प्रदेशच्या ओपनियन पोलमध्ये जवळपास 17 हजार लोकांची मते जाणून घेतली आहेत.

या सर्व्हेमध्ये काँग्रेस (Congress) आणि भाजपा (BJP) या पक्षांनी किती जागा मिळतील, असा प्रश्न विचारण्यात आला होता. मध्य प्रदेशमध्ये भाजपा की काँग्रेस? कुणाचे सरकार स्थापन होणार, याबाबत जनतेने आपले मत सर्वेक्षणात नोंदवले आहे.

मध्य प्रदेशात मतांची भाजपाला 44 टक्के आणि काँग्रेसला सुद्दा 44 टक्के, तर बसपाला 20 टक्के आणि इतर पक्षांना 10 टक्के मते मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मध्य प्रदेशात विधानसभेच्या एकूण 230 जागा आहेत. त्यामध्ये भजपाला 106 ते 118 जागा आणि काँग्रेसला 108 ते 120 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. बसपा ला 0 ते 4 जागा मिळू शकतात, असे सर्व्हेमध्ये म्हटले आहे.

इतर पक्षांना 0 ते 4 जागा मिळू शकतात.

सर्व्हेमध्ये सहभाग घेतलेल्या 57 टक्के नागरिकांनी पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांना पंसती दर्शवली आहे. तर, 18 टक्के लोकांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नावाला पसंती दिली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना तीन टक्के लोकांनी पसंती दर्शवली आहे. तर 14 टक्के लोकांना अन्य उमेदवारांना पसंती दर्शवली आहे.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT