IAS Sunil Kendrekar News : धडाकेबाज 'आयएएस' अधिकारी सुनील केंद्रेकर का कंटाळले?

IAS Sunil Kendrekar Disinterested : धडाकेबाज आयएएस अधिकारी म्हणून सुनील केंद्रेकरांची ओळख आहे.
IAS Sunil Kendrekar News
IAS Sunil Kendrekar NewsSarkarnama
Published on
Updated on

IAS Sunil Kendrekar Voluntary Retirement : छत्रपती संभाजीनगरजे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या निर्णायामुळे एकच चर्चा सुरु झाली आहे. धडाकेबाज आयएएस अधिकारी म्हणून सुनील केंद्रेकरांची ओळख आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काही उपायोजना सांगितल्या होत्या. परंतु त्यांनी अचाणक स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज सादर केल्याने एकच चर्चा झाली.

सुनील केंद्रेकरांनी (Sunil Kendrekar) हा निर्णय का घेतला? याबाबत अनेक चर्चांना उधाण आले आहे. केंद्रेकर यांनी राज्य सरकारकडे गेल्या महिन्यात व्हीआरएससाठी अर्ज केला होता. त्यामुळे केंद्रेकर का कंटाळले अशी चर्चा सुरु आहे. त्यांच्या निवृत्तीला अवघे दोन अडीच वर्ष बाकी असताना असे काय घडले की त्यांना थेट स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय घ्यावा लागला. केंद्रेकर हे 2002 च्या बॅचचे आयएएस (IAS) अधिकारी आहेत.

IAS Sunil Kendrekar News
Sunil Kendrekar Voluntary retirement News : स्वेच्छा निवृत्तीनंतर केंद्रेकर शेती, आध्यात्म अन् समाजसेवेला वाहून घेणार..

मराठवाड्यातील (Marathwada) शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी केंद्रेकरांनी काही दिवसांपूर्वी एक सर्व्हे केला होता. या सर्व्हेनंतर त्यांनी खरीप आणि रब्बी दोन हंगामाच्या सुरवातीला पेरणीसाठी शेतकरी कुटुंबाला प्रत्येकी 10 हजार रुपयांची मदत करावी असे म्हटले होते. तसा अहवाल त्यांनी सरकारकडे पाठवला होता. मात्र, त्यांच्या या भुमिकेमुळे सरकार व सनदी अधिकाऱ्यांच्या लॉबीचा त्यांना त्रास झाल्याची चर्चा आहे.

तसेच यामुळे राज्यभरात त्यांच्या नावाची चर्चा सुरू असतांना त्यांनी अचानक निर्णय घेतल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, राज्य सरकारमधील मंत्र्यांने एका अधिकाऱ्याची खासगी सचिवपदी नियुक्ती करावी, असे पत्र सामान्य प्रशासन विभागाला दिले होते. मात्र, त्या अधिकाऱ्याची खातेनिहाय चौकशी (डीई) सुरू होती. ही चौकशी विभागीय आयुक्त कार्यालयात सुरू होती. चौकशी सुरू असल्यानेच खासगी सचिव म्हणून त्या अधिकाऱ्याची नियुक्ती झाली नाही.

IAS Sunil Kendrekar News
ECI Action Against Collector : कार्यशाळेला दांडी मारलेल्या जिल्हाधिकारी, निवडणूक अधिकाऱ्यांचे आयोगाने कान उपटले; मागितलं स्पष्टीकरण

त्यामुळे त्या अधिकाऱ्याची चौकशीमध्ये त्याच्या बाजूने निर्णय देण्यासाठी मंत्रालयातून विभागीय अधिकाऱ्यांवर दबाव आणली असल्याची चर्चा होती. मात्र, विभागीय आयुक्तांनी 'डीई' संदर्भात विरोधी निर्णय दिला. त्या प्रकरणामुळे तर केंद्रेकर यांनी स्वेच्छानिवृत्तीचा निर्णय घेतला नाही ना? अशी चर्चा सुरु आहे.

दरम्यान, राज्यातील काही मोजक्या धडाकेबाज आयएएस अधिकाऱ्यांच्या यादीत केंद्रेकरांच्या नावाची चर्चा नेहमीच असते. विक्रीकर सहआयुक्त, प्रभारी जिल्हाधिकारी, बीडचे जिल्हाधिकारी, सिडकोचे मुख्य प्रशासक, प्रभारी मनपा आयुक्त त्यानंतर विभागीय आयुक्त पदावर ते कम करत आहेत.

IAS Sunil Kendrekar News
Jalgaon Politics: खडसे आणि गुलाबराव पाटलांमध्ये समझोता; अब्रू नुकसानीचा दावा मागे

बीडचे (Beed) जिल्हाधिकारी असताना त्यांची बदली झाली होती तेव्हा, अख्खा बीड त्यांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरला होता. शेतकरी कुटुंबातून आलेल्या केंद्रेकरांनी नेहमीच शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या उपयोजना राबवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, अशा धडाकेबाज आयएएस अधिकाऱ्याने अचानक व्हीआरएस घेतल्याने त्यांनी हा निर्णय का घेतला असावा याचे उत्तर मिळाले नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com