Rahul Gandhi News :  Sarkarnama
देश

Rahul Gandhi Marriage: 'या' अभिनेत्रीला करायचं आहे राहुल गांधींशी लग्न

सरकारनामा ब्यूरो

Rahul Gandhi Marriage News : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या लग्न हा राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य माणसाचाही चर्चेचा विषय असतो. काही दिवसांपूर्वी त्यांच्या भेटीला आलेल्या काही महिलांनी राहुल यांच्या आई आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना, तुम्ही राहुल गांधींचं लग्न का करत नाही, असा प्रश्नच विचारला होता. त्यानंतर आता एका अभिनेत्रीने राहुल गांधी यांच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे तिने त्यासाठी एक अटही घातली आहे.

बोल्डनेस आणि बोल्ड फोटोशूटसाठी प्रसिद्ध असलेली शर्लिन चोप्राने राहुल गांधींशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. शर्लिन लाइमलाइटमध्ये राहण्याची एकही संधी सोडत नाही. तिच्या वक्तव्यांमुळेही ती अनेकदा ट्रोल होत असते. अशातच तिने थेट राहुल गांधींशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

शर्लिन राहुल गांधीसोबत लग्न करण्याचे स्वप्न पाहत आहे. शर्लिनने राहुल गांधींसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माध्यमांशी बोलताना तिने ही इच्छा व्यक्त केली आहे. ‘तुला राहुल गांधींसोबत लग्न करायला आवडेल का?’ उत्तरात ती म्हणाली, ‘हो, का नाही.’ यासोबत शर्लिनने एक अटही ठेवली. लग्नानंतर आपण आडनाव बदलणार नाही, असं तिने म्हटलं आहे. त्यामुळे सध्या शर्लिन चांगलीच चर्चेत आली आहे.

राहुल गांधींनी शर्लिन चोप्राच्या या अटी मान्य केल्या तर ती त्यांच्याशी लग्न करण्यास तयार आहेत. शर्लिनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर यूजर्सच्या प्रतिक्रियाही पाहायला मिळत आहेत. शर्लिनच्या या व्हिडिओवर लोक कमेंट्स करत आहेत. एका यूजरने लिहिले आहे की, शर्लिनने राखी सावंतसारखी नशा केली आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT