Sharad Pawar Vs Ajit Pawar : अजित पवारांना पक्ष अन् चिन्ह देण्यासाठी मोदी-शाहांचा दबाव; शरद पवारांचा गौप्यस्फोट

BJP Pressure On Sharad Pawar : भाजपविरोधात तडजोड नसल्याचा पवारांचा निर्धार
Pune NCP with Sharad Pawar in Delhi
Pune NCP with Sharad Pawar in DelhiSarkarnama
Published on
Updated on

Delhi News : शिवसेना फटल्यानंतर ठाकरेंना डावलून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना 'बळ' दिलेल्या मोदी-शाहांची जोडी आता राष्ट्रवादीतील फुटीरांना ताकद देण्याच्या तयारीत आहेत. या राजकारणातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना धक्का देण्याची भाजपची रणनीती असून पुढच्या लोकसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादीचे नाव आणि चिन्ह अजित पवारांच्या गटाला जाईल याचा बंदोबस्त दिल्लीत केला जात आहे. यामागे मोदी-शाहांचा हात असल्याचे सांगून शरद पवारांनी दिल्लीतील कट-कारस्थानाकडे बोट दाखवले. (Latest Political News)

राष्ट्रवादी काँग्रसमध्ये बंड केल्यानंतर अजित पवारांनी संख्याबळाच्या जोरावर पक्ष आणि चिन्ह घड्याळावर दावा ठोकाला आहे. सत्तेत सहभागी होताच अजितदादांचे भाजपच्या दिल्ली वर्तुळात वजन वाढल्याचे दिसून येत आहे. यातूनच केंद्र सरकारकडून पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्याबाबत दबाव आणला जात असल्याचा गौप्यस्फोट शरद पवारांनी केली आहे. मात्र आपण भाजपविरोधात घेतलेल्या भूमिकेत कुठलीही तडजोड करणार नसल्याचेही पवारांनी स्पष्ट करत कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत.

Pune NCP with Sharad Pawar in Delhi
Saamana Editorial News : अमित शाहांना महाराष्ट्र कळतो म्हणजे काय?; सामनातून भाजपवर घणाघात!

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर बहुतांश आमदारांनी अजित पवार गटात सामिल होण्याचा निर्णय घेतला. आमदार, खासदार अजित पवारांकडे गेले तरी आपल्याकडे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते असल्याचा दावा शरद पवारांनी केला आहे. या कार्यकर्त्यांच्या बळावर आपण पुन्हा सर्व काही मिळवू असा विश्वासही पवारांना आहे. अधिवेशनानिमित्त पवार सध्या दिल्लीत आहे. पुण्यातील कार्यकर्त्यांनी पवारांची दिल्लीत जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी कामाला लागण्याचे आदेश दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारल्याचे दिसून आहे.

Pune NCP with Sharad Pawar in Delhi
Rahul Gandhi Marriage: 'या' अभिनेत्रीला करायचं आहे राहुल गांधींशी लग्न

पुण्याचे शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दिल्लीतील निवासस्थानी पवारांची भेट घेतली. यावेळी पवारांनी त्यांच्याशी हितगूज करताना केंद्राकडून पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना देण्याचा दबाव असल्याचे सांगितले. पवार म्हणाले, "केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयात केंद्रातील काही नेत्यांचा हस्तक्षेप सुरू आहे. यातून राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह दुसऱ्या गटाला देण्यासाठी प्रयत्न होत आहेत. आपण मात्र केंद्राच्या दाबाबला बळी पडणार नसून काहीही झाले तरी भाजपविरोधात घेतलेल्या भूमिकेपासून दूर जाणार नाही. आपण पुन्हा सर्व काही उभे करून दाखवू. आपल्याला भाजप विरोधातच लढायचे आहे. मनात कुठेही शंका आणू नका, आगामी निवडणुकांच्या तयारीला लागा."

Pune NCP with Sharad Pawar in Delhi
Pune NCP with Sharad Pawar in DelhiSarkarnama

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होताच केंद्रीय मंत्र्यांकडून अजित पवारांना मानाचे स्थान दिले जात आहे. पवारांना शिंदे गटाचा विरोध असतानाही अर्थ खाते देण्यात आले. दिल्लीत जाऊन अजित पवारांनी वारंवार अमित शाह यांच्याशी वारंवार चर्चा केल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीं नी पुण्यात आल्यानंतर अजितदादांना शबासकी दिली होती. तर शाह यांनी तुम्ही योग्य जागी आलात असे म्हणत अजित पवारांचे कौतुकही केले आहे. आता अजित पवारांना राष्ट्रावादी पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह देण्यासाठी केंद्राकडूनच प्रयत्न सुरू असल्याचे शरद पवारांनी सांगितल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे भाजप आणि महाविकास आघाडीत नव्या वादाची सुरुवात होणार आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com