Rahul Gandhi  Sarkarnama
देश

Rahul Gandhi News : हा राहुल गांधींचा नव्हे, जनतेचा आणि सत्याचा विजय !

सरकारनामा ब्यूरो

Rahul Gandhi Press Conference :  मोदी अडवानावरून वादात अडकलेले आणि खासदारकी गमावलेल्या काँग्रेस नेते राहुल गांधींच्या शिक्षेला अखेर न्यायालयाने स्थगिती दिली . हा निकाल सत्ताधारी भाजपला चपराक मानला जात आहे ; तर काँग्रेसला विशेषत : राहुल गांधींचा उत्साह वाढविणार आहे. हा निकाल येताच , राहुल गांधी माध्यमांपुढे आले आणि भाजपला एकप्रकारे बघून घेण्याची भाषा बोलून दाखवली.

लोकसभा सदस्यत्व गमवून बससलेल्या राहुल गांधींना आता बळ मिळाले असून, त्यातून ते आता नव्या ताकदीने भाजपविरोधात लढणार असल्याचे स्पष्ट आहे. ' आज नाही तर उद्या, उद्या नव्हे तर परवा, विजय सत्याचाच होतो. माझे काम मला ठाऊक असल्याचे सांगत राहुल गांधींनी भाजपला इशाराच दिला. न्यायालयाचा निकाल हा राहुल गांधींचा नसून, तो लोकांचा असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. एकूण राहुल गांधी मोजकेच बोलले, पण भाजपविरोधात लढाई सुरू ठेवणार असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

राहुल गांधी यांना सुरत न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर ते लोकसभेच्या सदस्यत्वासाठी अपात्र ठरले होते. लोकसभा सचिवालयाने एक आदेश जारी करून राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा झाल्याच्या कारणावरून त्यांचे संसदेचे सदस्यत्व रद्द केले होते. पण सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे राहुल गांधींच्या राजकीय कारकिर्दीला पुन्हा एकदा संजीवनी मिळाली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर काँग्रेस पक्ष मोदी सरकारविरोधात आणखी आक्रमक झाल्याचे दिसत आहे. 26 विरोधी पक्षांची नवी आघाडी असलेल्या इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इनक्लुझिव्ह अलायन्ससाठीही राहुल गांधींबाबतचा हा निर्णय महत्त्वाचा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT