Supreme Court On Rahul Gandhi : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राहुल गांधींनी स्पष्ट केली रणनीती; म्हणाले...

Rahul Gandhi Defamation Case : राहुल गांधी संसदेत परतणार असल्याने इंडियात उत्साह
Rahul Gandhi
Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

Delhi News : काँग्रेस नेते, माजी खासदार राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने मोदी आडनाव मानहानीप्रकरणी मोठा दिलासा दिला आहे. सूरत उच्च न्यायालायने राहुल यांना सुनावलेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. यामुळे गांधी पुन्हा संसदेत लवकरच परतणार असल्याची चर्चा आहे. दिलासा मिळताच राहुल गांधींनी फक्त दोन ओळीतच पुढील रणनीती सांगितली आहे. यामुळे काँग्रेसमध्ये उत्साह संचारल्याचे दिसून येत आहे. (Latest Political News)

Rahul Gandhi
Eknath Khadse News : खडसेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पोलखोल केली!

मानहानीप्रकरणी गुजरातच्या उच्च न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावताच लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींची खासदारकी रद्द केली होती. या निर्णयाविरोधात अखेरची संधी म्हणून गांधींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती देल्याने आता पुन्हा राहुल यांना खासदारकी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या पार्श्वभूमीवर ट्विट करत राहुल गांधी म्हणाले, "काहीही झाले तरी भारताच्या कल्पनेचे रक्षण करणे माझे कर्तव्य असून त्यासाठी काम करत राहणार आहे."

Rahul Gandhi
Aaditya Thackeray On Rahul Gandhi Verdict: राहुल गांधींना 'सुप्रीम' दिलासा; आदित्य ठाकरेंचा जल्लोष

राहुल गांधी यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश बी. आर. गवई, जस्टिस संजय कुमार, जस्टिस पी. एस. नरसिंहा यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. राहुल गांधींच्यावतीने अभिषेक मनु सिंघवी यांनी तर दुसऱ्या बाजूने महेश जेठमलानी यांनी युक्तिवाद केला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राहुल गांधींना पुन्हा खासदारकी मिळून ते संसदेत परतण्यासाठी काँग्रेसच्या वतीने तयारी सुरू केली आहे.

राहुल गांधींनी २०१९ मध्ये मोदी आडनावाबद्दल केल्या टिपण्णीवरून त्यांच्यावर मानहानीचा खटला दाखल झाला होता. या प्रकरणी गुजरात न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्याने गांधींची खासदारकी झाली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाने राहुल यांची खासदारकी रद्द व्हावी म्हणूनच सर्वाधिक दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती का? एक दिवसाची शिक्षा कमी असती तरी त्यांची खासदारकी रद्द झाली नसती, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com