Arvind kejariwal  Sarkarnama
देश

Arvind Kejariwal : मला तुरुंगात टाकण्याची धमकी; केजरीवालांचा हेमंत बिस्व सरमांवर आरोप...

आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व सरमा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यातील वाकयुद्ध चांगलेच रंगल्याचे दिसत आहे.

सरकारनामा ब्युरो

Arvind Kejariwal News: आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व सरमा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यातील वाकयुद्ध चांगलेच रंगल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री सरमा यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर आज (२ एप्रिल) मुख्यमंत्री केजरीवाल आसाममध्ये दौऱ्यावर होते. या दौऱ्यात जनतेला संबोधित करताना त्यांनी पुन्हा एकदा सत्ताधारी भाजपसह स्थानिक पक्षांवरही निशाणा साधला.

यावेळी त्यांनी काँग्रेस, भाजप आणि असम गण परिषदेवर हल्लाबोल करत पक्षाला जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा जनतेची लूट केली. सर्व नेत्यांनी आसामला बरबाद केलं आहे. काँग्रेस 52 वर्षे, असम गण परिषदे 10 वर्षे आणि भाजप 7 वर्षे सत्तेत होती. पण या सर्व पक्षांनी जनतेची फसवणूक केली. संधी मिळताच त्यांनी लुटमार केली. अशी टिकाच केजरीवाल यांनी केली.

याचवेळी त्यांनी आसामच्या मुख्यमंत्री सरमा यांच्यावरही हल्लाबोल केला. 2016 साली हिमंता साहेबांचे सरकार स्थापन झाले. 2015 साली दिल्लीत आमचे सरकार स्थापन झाले पण सात वर्षे त्यांनी घाणेरडे राजकारण केले आणि मी दिल्लीचा विकास केला.असंही त्यांनी नमुद केलं.

हेमंत बिस्व सरमा यांनी अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात टाकण्याचा इशारा दिला होता. त्यावरही केजरीवाल यांनी भाष्य केलं. “दोन दिवसांपासून ते मला तुरुंगात टाकण्याची, मला अटक करण्याच धमकी देत आहेत. तुम्ही आसामचे मुख्यमंत्री झालात पण तुम्हाला इथली संस्कृती शिकता आली नाही. तुम्ही सात वर्षात काहीच केलं नाही.तुम्ही दिल्लीत या. मी तुम्हाला दिल्लीचे रस्ते दाखवतो. आम्ही मोहल्ला दवाखाने उघडले. पण तुमच्याकडे बेरोजगारांचा आवाज ऐकायलाही वेळ नाही. अशी टिकाही केजरीवाल यांनी केली.

दरम्यान, केजरीवाल यांच्या आसाम दौऱ्यापूर्वी हेमंत बिस्व सरमा यांनी केजरीवाल यांना थेट इशाराच दिला होता.माझ्या विरोधात एक शब्द बोललात की मी भ्रष्ट आहे, तर दुसऱ्याच दिवशी मी तुमच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल करेल, जसा मी मनिष सिसोदियांविरोधात दाखल केला होता.असा इशारा सरमा यांनी दिला होता. तसेच, कोणीतरी लोकांची दिशाभूल करत आहे. संपूर्ण देशात माझ्यावर एकही गुन्हा नाही. फक्त काही काँग्रेसवाल्यांनी माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत.असा आरोपही त्यांनी यावेळी केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT