Shiv Sena (UBT) leader Priyanka Chaturvedi has raised questions about Lawrence Bishnoi’s alleged influence from jail following the firing incident involving actor Tiger Shroff in Mumbai. Sarkarnama
देश

Tiger Shroff News : बिश्नोई गुजरातच्या तुरुंगात असूनही इतकी सत्ता कशी गाजवतोय? यामागे एक मोठी कहाणी... प्रियांका चतुर्वेदींचा दावा

Priyanka Chaturvedi on Tiger Shroff firing, Lawrence Bishnoi gang : मुंबई पोलिसांना लॉरेन्स बिश्नोईची चौकशी का करू दिली जात नाही, असा प्रश्नही प्रियांका चतुर्वेदी यांनी उपस्थित केला आहे.

Rajanand More

Mumbai News : चित्रपट अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर रविवारी मुंबईतील जुहू येथे बेछुट गोळीबार झाला. सुदैवाने या जीवघेण्या हल्ल्यातून टायगर श्रॉफ बचावला असून चालक जखमी झाला आहे. बिश्नोई गँगने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. गोळीबारानंतर दोन हल्लेखोर पसार झाले असून मुंबई पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, या घटनेमुळे बॉलीवूड हादरले असून राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले आहेत.

बिश्नोई गँगचा म्होरक्या लॉरेन्स बिश्नोई हा सध्या गुजरातमधील एका तुरुंगात आहे. मात्र, त्यानंतरही ही गँग देशभरात सक्रीय असल्याचे अनेकदा समोर आले आहे. लॉरेन्सचा परदेशात असलेला भाऊ अनमोल बिश्नोई याच्याकडून ही गँग चालविली जात असल्याचा दावा पोलिसांकडून केला जात आहे. त्यातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी मोठा दावा केला आहे.

प्रियांका चतुर्वेदी यांनी सोशल मीडियात पोस्ट करत म्हटले आहे की, गुजरातच्या साबरमती तुरुंगात बंद असलेला एक माणूस तुरुंगाबाहेर इतकी सत्ता कशी काय गाजवू शकतो?, हा लॉरेन्स बिश्नोई टोळीविषयी एक मोठा प्रश्न पडतो. भारतात नक्षलवाद जवळजवळ संपुष्टात आला असतानाही, भारत या टोळीवर नियंत्रण मिळवण्यात अपयशी का ठरतोय?, असा सवालही चतुर्वेदी यांनी केला आहे.

चतुर्वेदी यांनी यामागे एक मोठी कहाणी दडलेली असल्याचा दावा केला आहे. एवढेच नाही तर त्यांनी मुंबई पोलिसांना लॉरेन्स बिश्नोईची चौकशी का करू दिली जात नाही, असा प्रश्नही उपस्थित केला आहे. सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर मुंबई पोलिसांना तुरुंगातील त्या गुंडाची चौकशी का करता आली नाही? त्यासाठी कोण आणि का सहकार्य करत नाही? इथेच खरी कहाणी दडलेली आहे, असेही चतुर्वेदी यांनी म्हटले आहे.

दरम्यान, टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. फडणवीस हे राज्याचे गृहमंत्रीही आहेत. त्यांच्या काळात गुन्हेगारी वाढली असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. फडणवीस यांनी हल्लेखोरांना पोलीस शोधून काढतील, असा विश्वास व्यक्त केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT