

India political update : मागील काही दिवसांपासून नेहा बोरा, प्रशांत भूषण यांची सत्ता परिवर्तनाबाबतची विधाने व्हायरल होत आहेत. बोरा यांनी बांग्लादेशचे उदाहरण देत भारतातही सत्ता परिवर्तनाबाबत भाष्य केले होते. त्यावरून बरीच टीकाही झाली होती. बांग्लादेश, नेपाळसारखी हिंसा भारतातही करण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून केला जात आहे. आता केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनीही विरोधकांवर निशाणा साधला आहे.
किरेन रिजिजू यांनी सोशल मीडियात एक पोस्ट करत विरोधकांना जोरदार टोला लगावला आहे. त्यांनी त्यासाठी बांग्लादेश आणि फ्रान्समधील हिंसाचाराच्या घटनांचे उदाहरण दिले आहे. त्यांनी धक्कादायक विधानही केले आहे. बांग्लादेशमध्ये झालेल्या हिंसक घटना आणि फ्रान्समध्ये झालेली दंगल, लूटमार, त्याचप्रकारे षडयंत्र भारतासाठीही रचण्यात आले होते, असे रिजिजू यांनी म्हटले आहे.
भारतविरोधी गट आणि राजकीय नेत्यांनी मिळून युवकांना भडकविणे आणि रस्त्यांवर हिंसा पसरविण्याचे नियोजन केले होते. पण हे भयानक षडयंत्र रचणारे हे विसरले की भारत ना बांग्लादेश आहे, ना फ्रान्स. भारतामध्ये सत्ता परिवर्तन निश्चित होऊ सकते, पण ते केवळ निवडणुकांच्या माध्यमातून, सोरोसच्या माध्यमातून नाही, असेही रिजिजू म्हणाले आहेत.
दरम्यान, मागील काही महिन्यांपासून केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाविरोधात सातत्याने आंदोलने होत आहेत. त्याची सुरूवात कॉक्रोच जनता पार्टीने जंतर मंतरवर सुरू केलेल्या आंदोलनापासून झाली होती. यादरम्यान संसदेवरील मोर्चावेळी हिंसाचारही झाला होता. त्यानंतर देशभरात मोठ्या प्रमाणात युवक-युवती रस्त्यावर उतरले होते.
विरोधी पक्षांकडूनही निवडणूक आयोगाविरोधात सातत्याने आंदोलन केले जात आहे. त्यातच नेहा बोरा यांनी बांग्लादेशमधील युवकांकडून प्रेरणा मिळाल्याचे विधान करत सत्ता परिवर्तनावर भाष्य केले होते. प्रशांत भूषण यांनीही असेच विधान केल्याने भाजपकडून आता त्यावर राहुल गांधी आणि काँग्रेसवर निशाणा साधला जात आहे. त्यातच रिजिजू यांनी धक्कादायक विधान केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.