देश

Tirupati Ladu Controversy: 'लाडू' वादात प्रकाश राज यांची उडी, DCM पवन कल्याण यांच्यावर भडकले; म्हणाले,'आधीच देशात..?'

Deepak Kulkarni

Tirupati Prasad Controversy News : आंध्रप्रदेशचं राजकारण चांगलंच तापलं आहे. आजी - माजी मुख्यमंत्री असलेल्या चंद्राबाबू नायडू (ChandraBabu Naidu) आणि जगनमोहन रेड्डी यांच्यात तिरुमला तिरुपती मंदिरातील लाडूच्या प्रसादावरुन जुंपली आहे.

तिरुपती येथील मंदिरातील लाडू प्रसादात प्राण्यांची चरबी,बीफ टॅलो वापरले गेल्याचे समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू प्रसादावरुन उठलेल्या वादात आता साऊथचे फेमस अभिनेते प्रकाश राज यांनी उडी घेतली आहे.

संतापलेल्या अभिनेते प्रकाश राज यांनी उपमुख्यमंत्री आणि अभिनेता पवन कल्याण (Pavan Kalyan) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.तिरुमला तिरुपती मंदिरातील लाडू प्रसादात प्राण्यांची चरबी असलेले लाडू वाटप झाले असल्याचे समोर आल्याने नवा वाद आंध प्रदेशच नाहीतर देशपातळीवर गाजतो आहे.यावर आता अभिनेते प्रकाश राज यांनीदेखील पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

दाक्षिणात्य आणि बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेते प्रकाश राज यांनी सोशल मीडियावरील X वर महत्त्वाची पोस्ट केली आहे. त्या पोस्टमधून त्यांनी उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. ते म्हणाले, 'प्रिय मित्रा,तू ज्या राज्याचा उपमुख्यमंत्री आहेस, त्या राज्यात ही घटना घडली आहे. कृपया तू चौकशी लाव. या घटनेमागे दोषी कोण आहेत, ते शोधून त्यांना कडक शासन कर असं पवन कल्याणला यांना उद्देशून म्हटलं आहे.

याचवेळी त्यांनी तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू प्रसादाचा विषय देशपातळीवर नेल्यावरुनही पवन कल्याण यांना खडेबोल सुनावले आहे.ते पोस्टमध्ये म्हणाले, हा विषय राष्ट्रीय पातळीवर तापवण्यात काय अर्थ आहे. आधीच देशात कमी धार्मिक तणाव आहे का… (याबद्दल तुझ्या दिल्लीतील मित्रांचे आभार)” असा खोचक टोलाही अभिनेते प्रकाश राज यांनी लगावला आहे.

पवन कल्याण काय म्हणाले..?

उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी तिरुमला तिरुपती मंदिरातील लाडू प्रसादातील वादात प्रतिक्रिया दिली होती. यावेळी त्यांनी मागील सरकारच्या कार्यकाळात तुपाऐवजी प्राण्यांची चरबी (माशाचे तेल, डुकराचे मांस आणि गोमांस चरबी) मिसळल्याच्या निष्कर्षांमुळे आम्ही सर्वजण खूप व्यथित झाल्याचं म्हटलं आहे.

तसेच देशभरातल्या मंदिरांशी संबंधित सर्व समस्यांवर लक्ष ठेवण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर ‘सनातन धर्म संरक्षण मंडळ’ स्थापन करण्याची वेळ आल्याचंही म्हटलं होतं.तसेच ‘सनातन धर्माचा’ कोणत्याही स्वरूपात होणारा अपमान थांबवण्यासाठी आपण सर्वांनी त्वरित एकत्र आले पाहिजे हा विश्वासही व्यक्त केला होता.

काय आहे आरोप..?

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसाद स्वरुपात मिळणाऱ्या लाडूत तुपाऐवजी प्राण्यांच्या चरबीचा वापर केल्याचा गंभीर आरोप केला होता. या आरोपानंतर देशभरातली कोट्यवधि भाविकांच्या श्रध्देला ठेच पोहचली होती.

या प्रकरणावरून चंद्राबाबूंनी थेट वायएसआर पक्षाच्या सरकारसह माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी (Jagan Mohan Reddy) यांनाच आरोपीच्या पिंजर्यात उभे केले आहे. वायएसआर पक्षाचे सरकार असताना तिरुपती बालाजी मंदिरात लाडू प्रसादावरुन आंध्र प्रदेशचे राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे. पण रेड्डी यांच्या वायएसआर पक्षाने चंद्राबाबूंचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT