Shankarao Gadakh And Narendra Ghule : अजितदादाच्या संपर्कातील माजी आमदारांनं शिवसेनेच्या आमदाराचं केलं कौतुक; वाढवलं टेन्शन

Shiv Sena MLA Shankarao Gadakh praised by former MLA Narendra Ghule : शिवसेनेचे माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांचे माजी आमदार नरेंद्र घुले यांनी कौतुक केल्याने नेवास आणि शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातीय राजकीय घडामोडी चर्चेत.
Shankarao Gadakh
Shankarao Gadakh Sarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात वेगळेच राजकीय वारे वाहू लागलीत. या मतदारसंघात महायुतीचं फाटणार, असंच राजकीय चित्र आहे.

माजी आमदार घुले बंधू राजकीय चाचपणीत असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांचं कौतुक केल्याने वेगळी राजकीय समीकरणाची चर्चा सुरू झाली आहे.

शेवगावमधील घुले बंधू माजी आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) फुटल्यानंतर ते अजित पवार गटाच्या संपर्कात आहे. शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात भापजचा आमदार आहे. महायुतीत असल्यामुळं घुले बंधूंची अडचण झाली. यातून मार्ग काढण्यासाठी घुले बंधू चाचपणी करत आहेत. यात कितपत यश येईल, किंवा राजकीय बळ मिळले, याची चर्चा आहे. यातच माजी आमदार नरेंद्र घुले यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांचं कौतुक केलं आहे.

Shankarao Gadakh
Sujay Vikhe Vs Balasaheb Thorat : सुजय विखे थांबायला तयार नाय; थोरातांच्या घरासमोर जात..!

शिवसेनेचे (Shiv Sena) आमदार शकंरराव गडाख यांचं कौतुक केल्यानं माजी आमदार नरेंद्र घुले यांच्या राजकीय चाचपणीची चर्चा सुरू झाली आहे. नरेंद्र घुले म्हणाले, "मी, माजी आमदार पांडुरंग अभंग, माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी विधानसभेचं प्रतिनिधीत्व केलं. आम्हा तिघांना कधीही राज्यमंत्रिपद मिळालं नाही. परंतु शंकरराव गडाख थेट कॅबिनेट मंत्री झालं. याचा आम्हाला आनंद असून, जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. शंकरराव गडाख पुन्हा एकदा मंत्री होतील, नेवासा आणि नगर जिल्ह्याला पु्न्हा एकदा सुवर्णकाळ येईल". नेवासे तालुक्यात टेलपर्यंत पाणी आणण्याची धमक फक्त शंकरराव गडाख यांच्यातच आहे, असंही नरेंद्र घुले यांनी म्हटलं.

Shankarao Gadakh
Nashik Congress Agitation against BJP : विधानसभा निवडणुकीसाठी राहुल गांधींनी दिला महायुतीला प्रचाराचा मुद्दा?

विधानसभा निवडणुकीच्या तोंडजाव घुले आणि गडाख एकत्र आल्याने नेवासा आणि शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील राजकीय गणितं बदलणार अशी चर्चा आहे. घुले बंधू शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तयारी करत आहेत. परंतु महायुतीमुळे त्यांची अडचण झाली आहे. या मतदारसंघात भाजपचा विद्यमान आमदार आहेत. असे असले, तरी कोणत्याही परिस्थिती निवडणूक लढणार, असं सांगितलं जात आहे.

आमदार राजळे आणि ढाकणेंचं टेन्शन वाढलं

घुले बंधू राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या संपर्कात आहे. परंतु महायुतीमुळे त्यांचं तिकीट कापलं जाणार, असं सांगितलं जात आहे. असं असलं, तरी घुले बंधू अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. यातच माजी आमदार नरेंद्र घुले यांनी शिवसेनेचे आमदार शंकरराव गडाख यांचं कौतुक केल्यानं वेगळ्याच राजकीय समीकारणांची चर्चा सुरू झाली आहे. महाविकास आघाडीकडून शेवगाव-पाथर्डीमध्ये प्रतापराव ढाकणे जोरदार तयारी करत आहेत. गडाख आणि घुले यांचं नातगोत असली, तरी राजकीय जवळीमुळं प्रतापराव ढाकणे, तसंच भाजपचे विद्यमान आमदार मोनिका राजळे आणि त्यांचे कार्यकर्ते देखील अलर्ट मोडवर आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com