पणजी : गोव्यात विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) तोंडावर राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. तृणमूल काँग्रेसला (TMC) राज्यात मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे सरचिटणीस अॅड. यतिश नाईक (Ad.Yatish Naik) यांनी तडकाफडकी पक्षाला राजीनामा दिला आहे. त्यांनी तृणमूलच्या प्रमुख ममता बॅनर्जींना (Mamata Banerejee) राजीनामा पाठवला आहे.
गोव्याच्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेस आक्रमकपणे उतरली आहे. इतर पक्षांतील नेत्यांना फोडून तृणमूलने जोरदार सुरवात केली होती. तृणमूल नेत्या व खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर पक्षाने या निवडणुकीची धुरा सोपवली आहे. मात्र, निवडणूक जवळ येऊ लागताच तृणमूलला गळती लागली आहे. आता पक्षाच्या सरचिटणीसांनीच राजीनामा देऊन पक्षाला तोंडावर पाडले आहे. यतिश नाईक यांनी पक्ष सोडला आहे. त्यांना तृणमूलने उमेदवारी न देण्याचे कारण यामागे असल्याचे समोर आले आहे.
पक्ष सोडल्यानंतर यतिश नाईक म्हणाले की, मला डावलून पक्षात आलेल्या नवीन लोकांना उमेदवारी देण्यात आली. पक्षाने दोन उमेदवार याद्या जाहीर केल्या असून, त्यात माझे नाव नाही. मागील 15 वर्षांपासून साळगाव मतदारसंघात मी काम करीत आहे. या मतदारसंघातून तिकिटाचे आश्वासन मला दिले होते. त्यासाठी मी घरोघरी जाऊन प्रचार सुरू केला होता. आता पक्षाने मला बाजूला केल्याने मला अपमानित आणि निराश झाल्यासारखे वाटत आहे.
दरम्यान, अलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स (Aleixo Reginaldo Lourenco) यांनी नुकताच तृणमूल काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. त्यांनी ममता बॅनर्जी यांना पत्र लिहून राजीनामा दिला होता. त्यात त्यांनी राजीनाम्याचे कोणतेही कारण स्पष्ट केलेले नव्हते. लॉरेन्स हे काँग्रेस सोडून तृणमूलमध्ये आले होते. त्यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. लॉरेन्स हे दक्षिण गोव्यातील कुडतरे मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ते तृणमूलमध्ये गेले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.