मुंबई : शिवसेना (Shiv Sena) कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणी भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) अडचणीत आले आहेत. राणेंनी अटकपूर्व जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मागील काही दिवसांपासून गायब असलेले राणे अखेर प्रकटले आहेत. त्यांनी आज सलग तिसऱ्या दिवशी कणकवली पोलीस ठाण्यात हजेरी लावली. त्यावेळी महिन्यानंतर प्रथमच त्यांनी माध्यमांशी बोलून आपली भूमिका स्पष्ट केली.
मागील सुमारे महिनाभरापासून नितेश राणे गायब होते. ते आता प्रकटले असून, सलग तीन दिवस ते कणकवली पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजेरी लावत आहेत. या वेळी आज एका वृत्तवाहिनीशी बोलताना ते म्हणाले की, कणकवली पोलिसांनी चौकशीसाठी मला हजर राहण्याची नोटीस बजावली होती. त्यामुळे मी सलग तीन दिवस चौकशीसाठी हजर झालो. उद्याही मी चौकशीसाठी येणार आहे. पोलिसांच्या चौकशीला पूर्णपणे सहकार्य करेन, असा शब्द मी आधीच दिला होता. त्यानुसार मी कणकवली पोलीस ठाण्यात हजर झालो. यापुढेही पोलिसांना माझी गरज लागेल, तेव्हा मी हजर होईन. उद्या माझ्या जामीन अर्जावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
यावर राणेंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. विशेष म्हणजे राणेंच्या वतीने माजी अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी (Mukul Rohtagi) हे बाजू मांडत आहेत. याच रोहतगींनी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला जामीन मिळवून दिला होता. आर्यनला जामीन मिळवून देण्यात रोहतगी यशस्वी झाले होते. आता राणेंना या प्रकरणात ते दिलासा मिळवून देतात का हे पाहावे लागणार आहे. मात्र. रोहतगी हे राणेंच्या बाजूने मैदानात उतरल्याने आतापासूनच याची मोठ्या प्रमाणात चर्चा होऊ लागली आहे. राणेंच्या वतीने आधी उच्च न्यायालयात बाजू मांडणाऱ्या वकिलांऐवजी रोहतगींची निवड करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यामागे राणेंची अटक टाळण्यासाठी आता केवळ सर्वोच्च न्यायालयाचा एकमेव शिल्लक आहे हेही कारण आहे. (Nitesh Rane appears before police)
राणे यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. राणेंवर अटकेसारखी कठोर कारवाई करणार नाही, अशी हमी राज्य सरकारकडून न्यायालयात देण्यात आली आहे. त्यांना सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी अटकेपासून संरक्षण उच्च न्यायालयाने 27 जानेवारीपर्यंत कायम ठेवले होते. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यापासून गायब असलेले राणे 24 जानेवारीला प्रथमच कणकवली पोलिसांसमोर हजर झाले होते. त्यांची सुमारे पाऊण तास कणकवली पोलीस ठाण्यात चौकशी करण्यात आली होती. (Nitesh Rane Case Updates)
सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेच्या (Sindhudurg DCC Bank) निवडणूक प्रचारामध्ये शिवसेनेचे प्रचारक संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. या प्रकरणात नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्ण जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर राणे यांनी उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. त्यावरील दोन्ही बाजूचे युक्तीवाद 13 जानेवारीला पूर्ण झाला होता. नंतर 17 जानेवारीला उच्च न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला होता. दरम्यान, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राणे गटाला बहुमत मिळाले आहे. संतोष परब हल्ला प्रकरणातील आरोपी मनीष दळवी यांची बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.