Trinamool Congress political crisis: पश्चिम बंगालमध्ये सत्ता गमावल्यानंतर सैरभैर झालेल्या तृणमूल काँग्रेसच्या २० खासदारांनी पक्षातून बाहेर पडत कोणालाही माहिती नसलेल्या नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया (NCPI) या पक्षात प्रवेश केला होता. त्यामुळं या पक्षाचा भाव अचानक वाढला, पण आता तृणमूलच्या या खासदारांच्या गटामध्ये धुसफूस सुरु झाली असल्याची चर्चा आहे. यासंदर्भात या पक्षानं अधिकृत निवेदन प्रसिद्ध करुन याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
NCPI पार्टीनं काढलेल्या पत्रकात म्हटलं की, आमच्या हे निदर्शनास आलं आहे की, काही माध्यम संस्था आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स अशा बातम्या देत आहेत की, एनसीपीआयच्या खासदारांमध्ये अंतर्गत वाद निर्माण झाला आहे. पण या बातम्या पूर्णपणे खोट्या, दिशाभूल करणाऱ्या आणि कुठल्याही तथ्यांवर आधारित नाहीत.
अशा प्रकारची दिशाभूल करणाऱ्या माहितीचा पक्षाकडून इन्कार अन् निषेध केला जात आहे. आमचं सर्वांना आवाहन आहे की, कोणीही पुष्टी न केलेल्या बातम्या, अफवा आणि दिशाभूल करणाऱ्या माहितीवर विश्वास ठेवू नये आणि ती पसरवूही नयेत. अधिकृत माहिती आणि घोषणांसाठी फक्त NCPIच्या अधिकृत संवाद माध्यमावरच विश्वास ठेवावा.
NCPIचे सर्व खासदार हे अद्यापही एकजुटीनं काम करत आहेत आणि पश्चिम बंगालच्या विकासासाठी आणि तिथल्या नागरिकांच्या कल्याणासाठी तसंच देशाच्या हितासाठी कटिबद्ध आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत (NDA) विकसित भारत २०४७ चं व्हिजन पूर्ण करण्यासाठी काम करत आहोत, अशा शब्दांत NCPI नं अधिकृत निवेदन सादर करतं पक्षात विलीन झालेल्या तृणमूलच्या खासदारांबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
दरम्यान, NCPI हा २० जानेवारी २०२३ रोजी स्थापन झालेली नोंदणीकृत पण अमान्यताप्राप्त राजकीय पक्ष असून शिवली कुंडू, उत्तीया कुंडू या दाम्पत्यानं या पक्षाची स्थापना केली होती. पण स्थापनेपासून अद्यापपर्यंत तीन वर्षात या पक्षाचा एकही नगरसेवक, आमदार आणि खासदार निवडून आलेला नाही, त्यामुळं हा विजनवासात असलेला राजकीय पक्ष होता.
पण अचानक मे २०२६ मध्ये पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसचा भाजपनं पराभव केला. त्यामुळं गेल्या १५ वर्षांपासूनची तृणमूलची सत्ता जाऊन आता भाजपनं तिथं सत्ता स्थापन केली.
या राजकीय घडामोडीनंतर, 2024च्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील ४२ पैकी २९ जागा जिंकणाऱ्या तृणमूल काँग्रेसच्या एकतृतीयांश म्हणजेच २० खासदारांनी बंड केलं आणि आपला गट NCPI पक्षात विलीन केला.
त्यामुळं ज्या पक्षाचा एकही लोकप्रतिनिधी नव्हता त्या पक्षाला अचानक २० खासदार मिळाले त्यामुळं एनडीएसोबत असलेल्या या पक्षाचा भाव एकदम वधारला. त्यामुळं एनडीएतील भाजपनंतर हा पक्ष दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष ठरला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.