

Rajya Sabha debate : देशाच्या राजकारणात मागील महिनाभरात अनेक घडामोडी घडल्या. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाने देशभरात केंद्र सरकार आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या विरोधात रान उठविले होते. त्यानंतर प्रधानांना शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. या मुद्द्यावर संसदेत आठ दिवस गदारोळ सुरू होता. देशातील तरूणाईने सरकारविरोधात पहिल्यांदाच आवाज उठविलेला असताना भाजपचे खासदार राघव चड्ढा मात्र गायब होते.
आपण तरूणाई प्रतिनिधित्व करतो, असा दावा करणारे राघव चड्ढा अखेर गुरूवारी थेट राज्यसभेत अवतरले. राज्यसभेत गुरूवारी पेपरफुटी विरोधी दुरूस्ती विधेयकावर चर्चा झाली आणि त्यानंतर ते मंजूरही झाले. या चर्चेदरम्यान चड्ढा यांनी आपण पेपरफुटीच्या मुद्द्यावर का बोललो नाही, यावर पहिल्यांदाच भाष्य केले. विरोधी पक्षात असताना प्रश्न हे माझे शस्त्र होते. ते काम मी प्रामाणिकपणे केले.
आता माझा रोल बदलला आहे. मी सत्ताधारी पक्षात आहे. आता प्रश्न विचारणे नव्हे तर समस्येवर तोडगा काढणे, ही माझी जबाबदारी आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा समस्येतवर तोडगा निघेल, तेव्हा मी बोलेन, असे ठरविले होते. आज तो दिवस आहे. कॅमेरासमोर येऊन मीही बोलू शकलो असतो. पण बोललो नाही. आम्ही या (पेपरफुटी) आजारावर ठोस उपाय घेऊन आलो आहोत. नीट विद्यार्थ्यांचा राग मान्य आहे. त्यांनी त्यांची समस्या सांगितल्यानंतर पंतप्रधानांनी पालकाप्रमाणे व्यवस्थेत बदल केला. सरकारने विद्यार्थ्यांचे ऐकेल आणि त्यावरही कामही केले, असे कौतुक चड्ढा यांनी केले.
तोंडावर आपटले
पेपरफुटी विरोधी कायद्यावर बोलताना राघव चड्ढा म्हणाले, आरोपीच्या मनात भीती निर्माण करण्यासाठी सरकारने असा कायदा आणला आहे. आता आरोपीने स्वप्नातही पेपरफुटीबाबत विचार केला तर त्याची आत्मा थरथरेल, असे चड्ढा म्हणाले. या भाषणावरून आता ते सोशल मीडियात ट्रोल होऊ लागले आहेत. चड्ढा यांनी डिसेंबर २०२५ मध्ये म्हणजे संसदेच्या हिवाळी अधिवेशनात राज्यसभेत एक खासगी बिल मांडले होते.
चढ्डा यांनी मांडलेल्या बिलामध्ये पेपरफुटीतील आरोपींना किमान सात वर्षे किंवा आजन्म कारावासाची शिक्षा असावी, असे म्हटले होते. यावेळी त्यांनी सरकारवरही जोरदार टीका केली होती. नव्या कायद्यामध्ये आरोपीला जास्तीत जास्त १० वर्षांची शिक्षा होऊ शकते. मात्र, त्यानंतर चड्ढा यांनी या कायद्याचे समर्थन केले आहे. यावरून जूना व्हिडिओ आणि ट्विटवरून ते ट्रोल होऊ लागले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.