Onion News : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजप केंद्र सरकारला ज्या कांद्याने जेरीस आणले, त्या कांद्याचा यंदा मेगा स्टॉक करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. केंद्र सरकार एक लाख टन कांद्याचा बफर स्टॉक (Onion Buffer Stock) करणार आहे. या निर्णयानुसार ग्राहक संरक्षण मंत्रालयाने साठेबाजांवर कारवाईचे संकेत दिले आहे.
कांद्याच्या (Onion) वाढत्या भावामुळे केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदी घातली होती. या निर्णयामुळे कांद्याच्या भाव कोसळले. महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी यावर आंदोलन केले. परंतु केंद्र सरकारने निर्यातबंदी उठवली नाही. गुजरातमधील कांदा निर्यातबंदी काहीशी शिथील केली. त्याचा फायदा तेथील स्थानिक शेतकऱ्यांना झाला. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे पडसाद महाराष्ट्रात उमटले. लोकसभेच्या निवडणुकीत (Lok Sabha Elections) महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला. नाशिक (Nashik), अहमदनगर (Ahmednagar) भागातील शेतकरी आणि शेतकरी संघटनांनी मतदानाला जाताना गळ्यात कांद्याच्या माळा घालून जाण्याचा प्रकार केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
महाराष्ट्रातील कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांनी बराच प्रयत्न केला. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा ( Amit Shah) यांची भेट घेऊन लक्ष वेधले. आता केंद्र सरकारने एक लाख टन कांद्याचा बफर स्टॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा देशात दोन कोटी 54.7 लाख टन कांदा उत्पादन होण्याचा अंदाज आहे. गेल्यावर्षी कांद्याचे भाव विक्रमी पातळीवर पोहोचले होते. आता पुन्हा भाव वाढू नये म्हणून, अगोदर उपाययोजना करत केंद्र सरकार एक लाख टन कांद्याचा बफर स्टॉक करणार आहे. यामुळे बाजारातील कांद्याचे भाव नियंत्रणात राहतील. Central government will make buffer stock of onion
महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश ही राज्य कांदा उत्पादनात अग्रेसर आहेत. परंतु यंदा कांद्याचा उत्पादनात 16 टक्के घसरण झाली. त्यामुळे बफर स्टॉक करण्याचा निर्णय घेण्यात आला. रेडिएशन प्रोसेसिंगद्वारे हा स्टॉक करण्यात येणार असून, यामुळे कांदा खराब होणार नाही. नाशिक, ठाणे, मुंबई आणि सोनीपत येथे ही प्रोसेसिंग उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नाफेड आणि एनसीसीएफ यंदा पाच लाख टन कांद्याचा बफर स्टॉक करणार आहे. या बफर स्टॉकची वाहतूक वेगाने करता यावी, यासाठी केंद्राकडून रेल्वेशी बोलणी सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.