Congress News : लोकसभेच्या सहाव्या टप्प्यातील मतदान सुरू आहे. या टप्प्यात दिल्लीतील सातही जागांवर मतदान होत आहे. राहुल गांधी, प्रियांका गांधी, सोनिया गांधी यांनी आपल्या मतदानाचा हक्का बजावला. मात्र, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गांधी परिवाराला काँग्रेसच्या Congress 'पंजा' चिन्हाला मतदान करता आले नाही. ज्या नवी दिल्ली मतदारसंघात गांधी परिवार राहतो त्या मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार नाही. त्या ठिकाणी भाजप विरुद्ध आपची लढत होत आहे. दिल्लीत काँग्रेस आणि आपमध्ये आघाडी असून काँग्रेस सात पैकी तीन जागांवर तर आप चार जागांवर लढत आहे.
नवी दिल्ली मतदारसंघात 'आप'चे सोमनाथ भारती विरुद्ध भाजपच्या BJP उमेदवार बांसुरी स्वराज यांच्यात लढत होत आहे. गांधी परिवार सकाळी 9.30 च्या सुमारास मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी पोहचला. सोनिया गांधी आणि राहुल गांधी Rahul Gandhi मतदान केंद्रावर एकत्र आले. प्रियांका गांधी यांचे मतदान दुसऱ्या मतदान केंद्रावर असल्याने त्या त्यांच्या सोबत नव्हत्या. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी मतदानाचा हक्क बजावला.
मतदानानंतर राहुल गांधी यांनी ट्विट करत पहिल्या पाच टप्प्यांमध्ये मतदारांनी खोटे, द्वेष आणि अपप्रचार नाकारून तुमच्या जीवनाशी संबंधित तळागाळातील समस्यांना प्राधान्य दिले आहे. सहाव्या टप्प्यात देखील मतदारांनी मोठ्या संख्येने घराबाहेर पडावे, तुमच्या हक्कासाठी आणि तुमच्या कुटुंबाच्या भविष्यासाठी मतदान करावे असे आवाहन केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
नवी दिल्लीतील सात मतदार संघातील लढती होत आहे. त्यामध्ये उत्तर पूर्व दिल्ली लोकसभा मतदार संघात भाजपचे मनोज तिवारी विरुद्ध काँग्रेसचे कन्हय्या कुमार, चांदणी चौक मतदारसंघात भाजपचे प्रवीण खंडेलवाल विरुद्ध काँग्रेसचे जे पी अग्रवाल, उत्तर पश्चिम दिल्ली मतदारसंघात भाजपचे योगेंद्र चांदेलिया विरुद्ध काँग्रेसचे उदित राज, पूर्व दिल्ली मतदारसंघात भाजपचे हर्ष मल्होत्रा विरुद्ध आपचे कुलदीप कुमार, नवी दिल्ली मतदारसंघात भाजपच्या बांसुरी स्वराज विरुद्ध आपचे सोमनाथ भारती, पश्चिम दिल्ली मतदारसंघात भाजपचे कमलजित सेहरावत विरुद्ध आपचे महाबल मिश्रा, दक्षिण दिल्ली मतदारसंघात भाजपचे रामवीर सिंग बिधुरी विरुद्ध आपचे साही राम अशी लढत होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.