7 ऑक्टोबर हा दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी खास आहे. आजच्याच दिवशी, 2001 साली नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. या प्रसंगाची आठवण करून देत त्यांनी आपल्या ‘एक्स’ (ट्विटर) अकाऊंटवर त्या वेळची एक जुनी फोटो शेअर करत पोस्ट केली आहे.
मोदींनी या पोस्टमध्ये लिहिले आहे की, "2001 मध्ये आजच्याच दिवशी मी गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. देशवासियांच्या आशीर्वादाने आज मी सरकारप्रमुख म्हणून 25 सेवेत आहे. जनतेला याबद्दल मनःपूर्वक कृतज्ञता!” गेल्या 11 वर्षांत भारताने परिवर्तनाचा एक नवा अध्याय रचला आहे.
देशातील महिलाशक्ती, युवाशक्ती आणि मेहनती अन्नदात्यांना सशक्त बनविण्याचे काम सरकारने केले आहे. "25 कोटींपेक्षा जास्त लोकांना आम्ही गरीबीच्या चक्रातून मुक्त केले आहे. भारत आज जगातील आघाडीच्या अर्थव्यवस्थांमध्ये उंच स्थानावर आहे. आम्ही आरोग्यसेवा आणि सामाजिक सुरक्षेच्या मोठ्या योजना राबवत आहोत. आमचे शेतकरी नवोपक्रम करत आहेत आणि भारताला आत्मनिर्भर बनवत आहेत," असे त्यांनी सांगितले.
नरेंद्र मोदी 1987 साली अधिकृतपणे भारतीय जनता पक्षात दाखल झाले. संघटनात्मक कौशल्यामुळे त्यांना लवकरच पक्षाचे महासचिवपद मिळाले. त्यांच्या नेतृत्वाखाली 1987 मध्ये अहमदाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला मोठा विजय मिळाला. त्यानंतर त्यांनी राज्यात पक्षसंघटन मजबूत केले. त्यांच्या मेहनतीमुळे 1990 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप सत्तेत आला. अखेर 7 ऑक्टोबर 2001 रोजी नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारली आणि 2014 पर्यंत त्यांनी हे पद भूषवले.
2014 मध्ये भाजपने त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित केले. त्या निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने प्रचंड यश मिळवले आणि ते भारताचे 15 वे पंतप्रधान बनले. त्यानंतर 2019 मध्ये पुन्हा प्रचंड बहुमतासह दुसऱ्यांदा आणि 9 जून 2024 ला तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेऊन त्यांनी सत्तेची ‘सिल्व्हर जुबली’ पूर्ण केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.