Nashik Crime : भाजप पाठोपाठ रामदास आठवलेंचा निकटवर्तीय गोळीबार, खंडणी प्रकरणात अडकला!

Nashik crime Maharashtra extortion case : रिपब्लिकन पक्षाचे भूषण लोंढे यांची खंडणी वसुली, साथीदारांच्या अटकेनंतर झाला फरारी
Nashik Crime
Nashik CrimeSarkarnama
Published on
Updated on

Nashik Crime : नाशिक शहरातील गुन्हेगारीने पोलिसांना आव्हान दिले आहे. यापूर्वी भाजपच्या दोन माजी नगरसेवकांना खून प्रकरणी अटक झाली आहे. त्यामुळे पोलिसांपुढे राजकीय गुन्हेगारीचे आव्हान आहे.

सातपूर परिसरातील बियर बारमध्ये खंडणीसाठी हॉटेल मालकावर गोळीबार करण्यात आला. याप्रकरणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा कार्यकर्ता आणि माजी नगरसेवकाचा मुलगा भूषण लोंढे फरारी झाला आहे. पोलिसांनी त्याच्या अटकेसाठी पथके पाठवली आहेत.

गेल्या दोन महिन्यात भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे आणि जगदीश पाटील या दोघांना खून प्रकरणी अटक झाली. त्या पाठोपाठ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा निकटवर्तीय गोळीबार आणि खंडणी प्रकरणात अडकला आहे. या प्रकरणाने राजकीय नेत्यांचा गुन्हेगारीतील सहभाग चर्चेत आहे.

दोन दिवसांपूर्वी सातपूर येथील बियर बार मालकावर खंडणीसाठी गोळीबार करण्यात आला. त्यानंतर त्याच्यावर चोपर नेही हल्ला करण्यात आला. जखमी बिअर बार मालक वरून तिवारी यामध्ये गंभीरित्या जखमी झाला आहे.

या प्रकरणात गोळी झाडणारा शुभम पाटील, दुर्गेश वाघमारे आणि आकाश उर्फ अभिजीत अडांगळे यांना पोलिसांनी अटक केली. हे तिघेही सध्या पोलीस कोठडीत आहेत. पोलीस त्यांच्या सहभागाची चौकशी करीत आहेत.

या गोळीबार प्रकरणात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते आणि माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांचे चिरंजीव भूषण लोंढे, प्रिन्स सिंग, राहुल गायकवाड सनी विठ्ठल कर शुभम निकम वेदांत चाळगे हे गुन्हेगार फरार झाले आहेत. या खंडणी प्रकरणात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या भूषण लोंढे हा सूत्रधार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Nashik Crime
MPSC चा मोठा निर्णय! अर्जासोबतच अपलोड करावी लागणार 'ही' कागदपत्रे; जाणून घ्या तपशील

नाशिक शहरात खून, वाहनांची मोडतोड आणि दहशत निर्माण दिली जात आहे. पोलिसांना त्यावर नियंत्रण आणता आले नाही. त्यामुळे थेट मुख्यमंत्र्यांकडे शहरातील भाजपच्या तिन्ही आमदारांनी तक्रार केली होती. त्यानंतर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरातील 12 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या.

Nashik Crime
PMC Election 2025: अजितदादांवर मुरलीअण्णा ठरले भारी! दोनवेळा सांगून जे भाजपला पाहिजे तेच केले

ही कार्यवाही होत असतानाच शहरात बिअर बार मालकांकडून नियमितपणे खंडणी वसूल केली जात असल्याचे प्रकरण उघड झाले आहे. सातपूरच्या बिअर बार मालकांकडून लोंढे याला खंडणी दिली जाते असे धक्कादायक प्रकरण उघड झाले. हे थेट पोलिसांनाच आव्हान आहे. त्यावर काय कार्यवाही करतात याची उत्सुकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com