Toilet Tax Sarkarnama
देश

Toilet Tax : आता ही काय भानगड! देशातील ‘या’ राज्यात टॉयलेट टॅक्स? निर्मला सीतारमण भडकल्या

Himachal Pradesh Congress Government : हिमाचल प्रदेशातील शहरी भागात घरातील प्रत्येक टॉयलेटवर टॅक्स लावला जाणार असल्याची चर्चा आहे.

Rajanand More

New Delhi : देशातील नागरिकांना अनेक प्रकारचे टॅक्स भरावे लागतात. पण तुम्ही कधी ‘टॉयलेट टॅक्स’विषयी ऐकले आहे का? हा कुठे परदेशात लावला जाणारा टॅक्स नसून आपल्या देशातच आकारला जाणार असल्याची चर्चा आहे. हिमाचल प्रदेश सरकारने तसा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे.

शहरी भागातील घरातील प्रत्येक टॉयलेटवर टॅक्स आकारला जाणार असल्याच्या बातम्या हिमाचल प्रदेशातून येत आहेत. प्रत्येक टॉयलेटवर 25 रुपये टॅक्स द्यावा लागणार असल्याचे समजते. सरकारने हा दावा फेटाळून लावला असला तरी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी हिमाचल प्रदेशातील काँग्रेस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

सीतारमण यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले आहे की, हे खरे असेल तर अविश्वसनीय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छता ही लोकांची चळवळ बनवली. पण इथे काँग्रेस टॉयलेटसाठी लोकांवर टॅक्स लावत आहे. त्यांनी त्यांच्या काळात लोकांना स्वच्छतेच्या चांगल्या सुविधा दिल्या नाहीत, याची लाज वाटते. पण हे पाऊल देशासाठी लाजिरवाणे असल्याची टीका सीतारमण यांनी केली आहे. भाजपच्या इतर नेत्यांनी सरकारला कोंडीत पकडले आहे.

Nirmala Sitharaman Tweet

नेमका प्रकार काय?

सरकारने 1 ऑक्टोबरला काढलेल्या नोटिफिकेशननुसार, शहरी भागातील प्रत्येक घरातील टॉयलेट सीटच्या संख्येनुसार प्रत्येकी 25 रुपये अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे. हे पैसे सांडपाणी बिलामध्ये समाविष्ट केले जातील. ज्या नागरिकांकडून सरकारी सांडपाणी व्यवस्थेचा वापर केला जातो, त्यांना दरमहा हे पैसे द्यावे लागणार आहेत.  

मुख्यमंत्री सुखविंदर सिंह यांनी सांगितले की, विधानसभा निवडणुकीआधी भाजपने हिमाचल प्रदेशातील सभांमध्ये पाणी मीटर मोफत देण्याची घोषणा केली होती. पाण्यासाठी कोणतेही पैसे आकारले जाणार नाहीत, असे म्हटले होते. आम्ही प्रत्येक कुटुंबाकडून शंभर रुपये घेणार आहोत. त्यामध्ये फाईव्ह स्टार हॉटेलही आहे. यामध्ये टॉयलेट टॅक्सचा काही संबंध नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT