Supreme Court : …हिंमत कशी केली? उद्या माझ्या घरीही याल! सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी वकिलाला झापले

CJI Dhananjay Chandrachud Lawyer : एका वकिलांनी ऑर्डरमधील माहिती कोर्ट मार्शलला विचारल्याचे समोर आल्यानंतर सरन्यायाधीश चांगलेच भडकले.
Dhananjay Chandrachud
Dhananjay ChandrachudSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे दोन दिवसांपूर्वीच एका वकिलावर चांगलेच भडकले होते. आता गुरूवारी पुन्हा एकदा त्यांनी वकिलाला झापले आहे. वकिलांनी एका ऑर्डरमधील मजकूराबाबत कोर्ट मास्टरला विचारणा केल्याचे समोर आल्यानंतर सरन्यायाधीशांनी त्यांना कोर्टातच फटकारले.

सुप्रीम कोर्टात गुरूवारी एका प्रकरणावर झालेल्या सुनावणीदरम्यान कोर्टाच्या काही टिप्पणींचा उल्लेख आदेशाच्या अंतिम मसुद्यात नसल्याबाबत वकिलांनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांना सांगितले. हे तुम्हाला कसे कळले, असे कोर्टाने त्यांना विचारले. त्यार त्यांनी कोर्टा मास्टरकडे विचारणा केल्याचे मान्य केले.

Dhananjay Chandrachud
Assembly Election 2024 : प्रचार उरकून भाजपचे स्टार प्रचारक थेट राहुल गांधींच्या सभेत; काँग्रेसमध्ये केला प्रवेश

वकिलांनी कोर्ट मास्टरला ऑर्डरबाबत विचारल्यानंतर सरन्यायाधीशांचा पारा चढला. त्यांनी वकिलांना चांगलेच सुनावले. ते म्हणाले, मी कोर्टात काय लिहिले हे तुम्ही कोर्ट मास्टरला विचारण्याची हिंमत कशी केली? उद्या तुम्ही माझ्या घरी याल आणि खासगी सचिवांना विचाराल की, मी चेंबरमध्ये काय लिहित आहे? वकिलांनी शालीनतेची मर्यादा ओलांडली आहे की काय?

आम्ही ज्यावर सही करतो तो अंतिम आदेश असतो, असेही सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी वकिलांना सांगितले. अशा प्रकारच्या ट्रिक पुन्हा वापरू नका. माझ्याकडे फारसा वेळ नाही. पण मी असेपर्यंत माझे सचिव किंवा स्टेनोग्राफरकडे जाणे, अशा गोष्टी करू नका, अशी तंबी सरन्यायाधीशांनी वकिलांना दिली.

Dhananjay Chandrachud
Malkhan Singh : हवाई दलातील जवानाचा मृतदेह सापडला 56 वर्षांनी; वाट पाहता-पाहता पत्नी-मुलाचे निधन, नातवाकडून अंत्यसंस्कार

दरम्यान, सरन्यायाधीश चंद्रचूड आणि न्यायाधीश जे. बी. पारदीवाला व मनोज सिन्हा यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी कोळसा खाणीसंदर्भात एक प्रकरण आले होते. हेच प्रकरण सोमवारीही खंडपीठासमोर आले होते. आपल्या बाजूने आदेश मिळण्यासाठी एकच प्रकरण सातत्याने पुढे आणण्याची प्रथा थांबवण्याची गरज असल्याचे सांगत कोर्टाने वकिलांना खडसावले होते.

सीजेआय चंद्रचूड म्हणाले होते की, ही एक नवी प्रथा आहे. वेगवेगळे वकील एकच प्रकरण सुचीबध्द करण्यासाठी मांडतात. तुम्ही सर्वजण संधी साधत आहात. सरन्यायाधीश म्हणून माझ्याकडे जो थोडाफार विवेक आहे, त्याचा वापर मी तुमच्या बाजूने कधीही करणार नाही. तुम्ही कोर्टाला भटकवू शकत नाही. माझी विश्वासार्हता पणाला लागली आहे. मला सर्वांसाठी मानक नियमांचे पालन करायला हवे, असेही सरन्यायाधीशांनी ठणकावले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com