Tamilaga Vettri Kazhagam has issued strict instructions against banners and celebrations that obstruct public movement. Sarkarama
देश

CM Vijay news : विजय यांनी घेतला तमिळनाडूसह संपूर्ण देशातील जनतेच्या मनातला निर्णय; भाजप, काँग्रेसलाही 'ते' जमलं नाही...

TVK banner ban : जनतेला त्रास होईल असे वर्तन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पक्षाने दिला आहे.

Rajanand More

Tamil Nadu political news : देशभरातील बहुतेक सर्वच राज्यांतील जनतेला सार्वजनिक ठिकाणी अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अनधिकृत होर्जिंग, बॅनर, विनापरवानगी उत्सव-कार्यक्रम साजरे करून रस्ते अडविणे या गोष्टीही नागरिकांसाठी अडचणीच्या ठरतात. तमिळनाडूमध्ये सत्तेत आलेल्या मुख्यमंत्री विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम (TVK) या पक्षाने नेमका त्यावरच घाव घातला आहे.

निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विजय यांनी अनेक आश्वासने देत लोकांची मते मिळविली. आता दिलेली आश्वासने अन् अपेक्षा पूर्ण करण्याच्या दिशेने त्यांनी पावले टाकण्यास सुरूवात केली आहे. पहिल्या दिवशी मोफत वीज, महिलांच्या सुरक्षेसाठी स्वतंत्र सेल, ड्रग्जविरोधी सेल स्थापन करण्याचा निर्णय घेतला. आता सरकारपाठोपाठ विजय यांचा पक्षही पुढे सरसावला आहे.

विजय यांच्या पक्षाने कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसाठी संदेश जारी केला आहे. पक्षाने सोशल मीडियात पोस्ट करत म्हटले आहे की, पक्षाची स्थापना ही केवळ तमिळनाडूतील जनतेच्या भल्यासाठी करण्यात आली आहे. आता तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्यावर एक मोठी जबाबदारी सोपवली आहे. आपण त्या उद्दिष्टाच्या दिशेने वाटचाल केली पाहिजे.

पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याने वाढदिवस, कौटुंबिक कार्यक्रम किंवा इतर कोणत्याही प्रसंगी रस्त्यांवर, सार्वजनिक ठिकाणी, लोकांची गर्दी होत असलेल्या ठिकाणी किंवा वाहतूकीला व लोकांना त्रास होईल, अशा प्रकारे बॅनर, पोस्टर लावू नयेत. जनतेला त्रास होईल, असे कोणतेही उत्सव किंवा कार्यक्रम साजरे करू नयेत, असे आवाहन पक्षाने केले आहे.

जनतेला त्रास होईल असे वर्तन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पक्षाने दिला आहे. पक्षाच्या या निर्णयावर लोकांकडून सकारात्मक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये अनधिकृत होर्डिंग, फलकांची समस्था भेडसावते. बेकायदेशीर उत्सव, कार्यक्रमांमध्ये नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. यापार्श्वभूमीवर विजय यांच्या पक्षाने घेतलेल्या निर्णयाला महत्व प्राप्त झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT