CM Vijay government : तमिळनाडूच्या राजकारणात वादळ; माजी मुख्यमंत्र्यांच्या पक्षात पडली उभी फूट, विजय यांना पाठिंबा जाहीर

AIADMK split news, Shanmugam faction support : शन्मुगन यांनी आमदार एस. पी. वेलुमणी यांना गटनेता म्हणून नेमले आहे. तर दुसऱ्या गटाने पलानीस्वामी यांची गटनेतेपदी निवड केली आहे.
CM Vijay
CM Vijay Sarkarnama
Published on
Updated on

Tamil Nadu politics : विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर तमिळनाडूमध्ये अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. सुरूवातीला झालेला सत्तास्थापनेचा घोळ मिटल्यानंतर आता एका मोठ्या पक्षात फूट पडली आहे. सुमारे ३० आमदारांचा पाठिंबा असलेले एआयडीएएमके पक्षाचे ज्येष्ठ नेते सी. व्ही. शन्मुगन यांनी बंड केले आहे. मंगळवारी त्यांनी अधिकृतपणे मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे त्यांचे सरकार सुरक्षित झाले आहे.

शन्मुगन यांनी आज सकाळी पाठिंब्याची अधिकृत घोषणा करताना पक्षात फूट पाडण्याचा आपला हेतू नसल्याचे सांगितले. त्यांना पाठिंबा असलेल्या आमदारांकडून AIADMK पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री इडाप्पडी के. पलानीस्वामी यांनी पदाचा राजीनामा देण्याची मागणी असल्याची चर्चा आहे. यापार्श्वभूमीवर शन्मुगन यांनी हे पाऊल उचलल्याने खळबळ उडाली आहे. पक्षाला निवडमुकीत ४७ जागा मिळाल्या आहेत.

विजय यांच्या सरकारला पुढील काही तासांत विधानसभेत बहुमत सिध्द करायचे आहे. त्याआधीच शन्मुगन यांच्या गटाने पाठिंब्याचा निर्णय घेतल्याने त्यांचे सरकार विश्वासदर्शक ठराव सहजपणे जिंकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

CM Vijay
Supreme Court : लोकशाही हायजॅक करू देणार नाही! सुप्रीम कोर्टाने पाच दिवसांतच घालविली भाजप नेत्याची आमदारकी, काँग्रेसची एक जागा वाढली...

दरम्यान, शन्मुगन यांनी एआयडीएमकेच्या मागील काही निवडणुकांमधील कामगिरीवर नाराजी व्यक्त करत थेट पलानीस्वामी यांना टार्गेट केले. पलानीस्वामी यांनी डीएमकेच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री व्हायचे होते. त्यांचा हा प्रस्ताव अनेक आमदारांना मान्य नव्हता. ईपीएस हे अजूनही आमचे नेते आहेत. पण डीएमकेसोबत जाणे आम्हाला मान्य नाही, असे शन्मुगन म्हणाले.

CM Vijay
CM Vijay news : मुख्यमंत्रि‍पदाचा कार्यभार हाती घेताच विजय यांचे 4 धडाकेबाज निर्णय; राहुल गांधींसमोरच स्टॅलिन यांना दिला पहिला झटका

शन्मुगन यांनी आमदार एस. पी. वेलुमणी यांना गटनेता म्हणून नेमले आहे. तर दुसऱ्या गटाने पलानीस्वामी यांची गटनेतेपदी निवड केली आहे. त्यामुळे दोन गटांमध्ये सभापती कुणाला मान्यता देणार याकडे लक्ष लागले आहे. या घडामोडींमुळे एआयडीएमके पक्षाला मोठा झटका बसला आहे. २०१६ पासून एआयडीएमकेला विधानसभेसह लोकसभा निवडणुकीतही अपेक्षित यश मिळालेले नाही. त्यामुळे अनेक पदाधिकारी पलानीस्वामी यांच्यावर नाराज असल्याचे चित्र आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com