TVK chief Joseph Vijay arrives at Chennai’s Jawaharlal Nehru Indoor Stadium for his swearing-in ceremony as Tamil Nadu Chief Minister. The historic Tamil Nadu CM oath event witnessed the presence of top political leaders. Sarkarama
देश

Vijay CM Oath Ceremony : तमिळनाडूत विजय यांचा शपथविधी; 'या' नेत्यांनाही मंत्रिपदाची संधी, यादी आली समोर...

Tamil Nadu CM Oath Ceremony : आजपासून तमिळनाडूमध्ये टीव्हीके सरकार अधिकृतपणे सत्तेवर येत आहे. विजय यांचा शपथविधी सोहळा चेन्नई येथील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियममध्ये मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.

Jagdish Patil

Tamil Nadu CM Oath Ceremony : अनेक नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर अखेर अभिनेता आणि टीव्हीके पक्षाचे प्रमुख जोसेफ विजय आज तमिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.

आजपासून तमिळनाडूमध्ये टीव्हीके सरकार अधिकृतपणे सत्तेवर येत आहे. विजय यांचा शपथविधी सोहळा चेन्नई येथील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियममध्ये मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.

टीव्हीके प्रमुख विजय सकाळी 10 वाजता मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. यापूर्वी त्यांनी 121 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र राज्यपालांकडे सादर करून बहुमत सिद्ध केले होते. त्यानंतर राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी विजय यांना सरकार स्थापन करण्यासाठी औपचारिक निमंत्रण दिले.

तर आजच्या शपथविधी सोहळ्यात विजय यांच्यासोबत आणखी नऊ नेते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या मंत्र्यांची यादी पुढीलप्रमाणे आहे :

एन. आनंद

आधव अर्जुना

डॉ. के.जी. अरुणराज

के.ए. सेंगोट्टय्यान

पी. व्यंकटरमणन

आर. निर्मलकुमार

राजमोहन

डॉ. टीके. प्रभू

सेल्वी एस. कीर्थना

दरम्यान, या ऐतिहासिक शपथविधी सोहळ्यासाठी देशभरातील अनेक राजकीय नेते आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे देखील या कार्यक्रमासाठी चेन्नईत दाखल झाले आहेत. तर विजय यांच्या नेतृत्वाखालील टीव्हीके सरकारकडून तमिळनाडूमध्ये अनेक मोठे राजकीय बदल घडतील, अशी आशा टीव्हीके समर्थकांकडून व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT