TVK Vijay CM Oath : तमिळनाडूमध्ये टीव्हीके पक्षाचे प्रमुख जोसेफ विजय यांचा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विजय यांनी शनिवारी (ता.०९) तमिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्याकडे १२१ सदस्यांच्या पाठिंब्याचं पत्र दिलं. त्यानंतर आज ते मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
तमिळनाडू विधानसभेचा निकाल जाहीर होऊन ५ दिवस पूर्ण झाले तरीही सत्तास्थापनेचा तिढा सुटला नव्हता. तमिळनाडू्च्या विधानसभा निवडणुकीत शंभरहून अधिक जागा जिंकणारे विजय यांनी सत्तास्थापनेचा दावा केला होता.
मात्र, राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सत्तास्थापनेसाठी आवश्यक असलेलं ११८ आमदारांच्या पाठिंब्याचा पत्र आणल्याशिवाय सत्तास्थापनेसाठी आमंत्रित न करण्याची अट विजय यांना घातली होती. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून विजय हे आमदारांच्या पाठिंब्यासाठी जुळवाजुळव करत होते.
अखेर त्यांनी काल राज्यपालांची भेट घेत त्यांच्याकडे १२१ सदस्यांच्या पाठिंब्याचं पत्र सोपवलं. त्यामुळे अखेर विजय हे तमिळनाडू्च्या मुख्यमंत्रिपदाची आज १० वाजता शपथ घेणार आहेत. तर १३ मे पूर्वी विश्वासदर्शक ठराव संमत करून घेण्याचे निर्देश राज्यपालांनी दिले आहेत.
दरम्यान, विजय यांच्या शपथविधीपूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी देखील विजय यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. शिवाय सध्या राहुल गांधी हे तमिळनाडूकडे रवाना देखील झाले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.