Twisha Sharma Dowry Case: मॉडेल आणि अभिनेत्री ट्विशा शर्मा हिच्या मृत्यू प्रकरणात तिची सासू आणि माजी न्यायाधीश गिरिबाला सिंह यांना केंद्रीय अन्वेषण विभागाने(सीबीआय) गुरुवारी अटक केली. सीबीआयचे पथक गुरुवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास गिरीबाला यांच्या निवासस्थानी दाखल झाले. त्यानंतर सायंकाळी साडेपाचपर्यंत त्यांची चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. गिरिबाला सिंह यांच्यावर हुंडाबळी सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी गिरिबाला यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आल्यानंतर आज त्यांना अटक करण्यात आली.
दरम्यान, आज सीबीआयने तपासणीदरम्यान सीबीआयने त्यांच्या घराची त्रिमितीय कॅमेऱ्याच्या साहाय्याने न्यायवैद्यक तपासणीही करण्यात आली. त्याचप्रमाणे आसपासच्या सर्व परिसराचे चित्रीकरण करण्यात आले असून, घटना घडली तेव्हा यापैकी कोणत्या भागातून ती दिसू शकत होती याची चाचपणी केली जाणार आहे.
मध्य प्रदेशचे महाधिवक्ता प्रशांत सिंह यांनी सांगितले की, “ट्विशा शर्मा यांच्या शरीरावर मृत्यूपूर्वीच्या सात जखमा आढळून आल्याने गंभीर गुन्ह्याचे संकेत मिळतात. तसेच, अनेक नोटिसा देऊनही गिरिबाला सिंग यांनी सहकार्य केले नाही. व्हॉट्सअॅप चॅटमधून ट्विशा शर्मा यांचा मानसिक छळ झाल्याचेही दिसून येते. या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून उच्च न्यायालयाने गिरिबाला सिंग यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. आता कोठडीतील चौकशी करायची की नाही, याचा निर्णय सीबीआय घेईल.”
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.