Delhi Assembly Session
Delhi Assembly Session  Sarkarnama
देश

वाद पेटला! भाजपच्या दोन आमदारांना मार्शलनी विधानसभेतून काढलं बाहेर

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : मुख्यमंत्र्यांवरील वादग्रस्त वक्तव्यावरून झालेल्या गदारोळात भाजपच्या तीन आमदारांना काल (ता.28) निलंबित करण्यात आले होते. तरीही आज सभागृहात पुन्हा मोठा गोंधळ झाला. गोंधळ घालणाऱ्या भाजपच्या दोन आमदारांना अखेर मार्शनली सभागृहाबाहेर काढले. हा प्रकार दिल्लीच्या विधानसभेत घडला. विधानसभा अधिवेशनात सत्ताधारी आम आदमी पक्ष (आप) विरुद्ध भाजप असा जोरदार संघर्ष सुरू आहे.

राजधानीतील ढासळत्या कायदा व सुव्यवस्थेवरून आपच्या आमदारांनी आज विधानसभेत केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला. एका अल्पवयीनावरील हल्ल्याचा मुद्दा आपचे आमदार प्रवीण कुमार यांनी उपस्थित केला होता. या प्रकरणी दिल्लीच्या पोलीस आयुक्तांना सभागृहात उत्तर देण्यासाठी बोलवावे, अशी मागणी त्यांनी केली. यावर भाजपचे आमदार संतप्त झाले. ते आपच्या आमदारांच्या भाषणात अडथळे आणू लागले. विधानसभा अध्यक्षांनी विनंती करून भाजपचे आमदार आपच्या सदस्यांना बोलू देत नव्हते. यामुळे अखेर विधानसभा अध्यक्षांनी मार्शलना पाचारण केले. भाजपचे आमदार विजेंदर गुप्ता आणि ओ.पी.शर्मा यांना मार्शनली बाहेर काढले.

दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष आदेशकुमार गुप्ता यांनी केजरीवाल यांच्याबद्दल मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांची माफी मागावी, अशी मागणी आपच्या सदस्यांनी काल सभागृहात लावून धरली होती. या वेळी आपचे सदस्य आक्रमक झाले होते. या प्रकरणी विरोधी पक्षनेत्यांनी माफी मागावी, अशी मागणीही आपने केली. या वेळी भाजपचे आमदार अनिल वाजपेयी, जितेंदर महाजन आणि अजय महावर हे थेट बाकावरच उभे राहिले. अध्यक्षांनी विनंती करूनही ते बाकावरून खाली न उतरल्याने विधानसभा अध्यक्ष रामनिवास गोयल यांनी तिघांनीही निलंबित केले. त्यांचे निलंबन एका दिवसासाठी होते. (Arvind Kejriwal Vs BJP News)

पंजाबच्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने (AAP) जोरदार विजय मिळवला आहे. यामुळे राष्ट्रीय पातळीवर भाजपला (BJP) रोखण्यासाठी आपकडे पाहिले जात आहे. आपचे संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) हे आता केंद्र सरकारसह पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) विरोधात आक्रमक झाल्याचे दिसत आहे. नुकतीच केजरीवालांनी विधानसभेतच थेट भाजप आमदारांना आपमध्ये येण्याची ऑफर देऊन खळबळ उडवून दिली होती. दिल्लीतील तीन महापालिका एकत्र करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यावरून आप विरुद्ध भाजप असा वाद सुरू झाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT