Amit Shah and Uddhav Thackeray Sarkarnama
देश

Uddhav Thackeray On Amit Shah : अमित शाह यांना पक्ष हितापुढे देश दुय्यम; ठाकरे देशाच्या सुरक्षेवरून शाहांवर भडकले

Pradeep Pendhare

Mumbai News : देशाच्या सुरक्षेवरून उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांना चांगलेच सुनावले. "सरकार पाडण्यासाठी, सुरक्षा व्यवस्थेशी खेळ करणारा गृहमंत्री पाहतोय, हा गृहमंत्री जागेवर राहता कामा नाही. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. जो संपूर्ण आपले अधिकार पक्षाच्या हितासाठी वापरतोय, तो देशाचे हित पाहणार नाही आणि लायक देखील नाही", असा संताप उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्यावर व्यक्त केला.

राज्यातील महाविकास आघाडीचे (MVA) सरकार पाडण्यासाठी केंद्रीतील राज्याचा उपमुख्यमंत्री तथा तत्कालीन विरोधी पक्षनेता वेशांतर करून देशाच्या गृहमंत्र्यांना भेटत असेल, तर ते गृहमंत्र्यांना मान्य आहे का? देशाचा सुरक्षितेचा प्रश्न आहे. सरकारी यंत्रणेतील माणूस वेशांतर करून आपल्याला भेटायला येतो. असा गृहमंत्री जागेवर राहातच कामा नये. सरकार पाडण्यासाठी, सुरक्षा व्यवस्थेशी खेळ करणारा, हा गृहमंत्री जागेवर राहता कामा नाये. त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. जो संपूर्ण आपले अधिकार पक्षाच्या हितासाठी वापरतोय, तो देशाच्या हितासाठी योग्य नाही आणि लायक देखील नाही, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

सरकार पाडण्यापूर्वी अजित पवार मास्क लावून दिल्लीला जायचे, यावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, जे काही झाले ते जाऊ द्या, देशाच्या सिक्युरिटाचा हा मुद्दा गंभीर आहे. आपल्या सिक्युरिटीला, अशी कोणी टोपी घालू शकेल का? ही फार भयानक गोष्ट आहे. त्यांनी गंमतीजमतीमधून ही गोष्ट बाहेर काढली आहे. एअरपोर्टच्या सुरक्षितेचा प्रश्न गंभीर आहे. तुम्ही साध्या-साध्या माणसाला छळता. मग सराकार पाडण्यासाठी राज्याचा उपमुख्यमंत्री तथा तत्कालीन विरोधी पक्षनेता वेशांतर करून देशाच्या गृहमंत्र्यांना भेटत असेल,तर ते गृहमंत्र्यांना मान्य आहे का? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी केला.

भाजप हा अमानुष आणि घृणास्पद काम करणारा पक्ष

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना अडकवण्यासाठी प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरीची मागत असल्याचा आरोपांवर अनिल देशमुख सुरवातीलापासून उघडपणे बोलत आहे. अनिल देशमुख माझ्याकडे देखील आले होते, असे उद्धव ठाकरे यांनी सांगत भाजपला चांगलेच धारेवर धरले.

अशी काम करणारे घृणास्पद लोकं सत्तेत बसले आहे की, बस्स! हे सगळं लोकं अमानुष आहेत. हे कुटुंब बघत नाहीत. मुलाबाळांवर घाणेरडे आरोप करतात. आयुष्य बरबाद करत आहेत. पण ते स्वतःकडे बघत नाही. त्यांनाही मुलबाळं आहेत. अशा घाणेरड्या प्रकरणात गुंतवण्याचा प्रयत्न केला. खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रकारामुळे त्यांचे आईवडिलांना किती दुःख झाले. ते देखील यांनी पाहिले नाही. पूर्वीचा भारतीय जनता पक्षा वेगळा होता. आताच भाजप हा अमानुष आणि अतिशय घृणास्पद काम करणारा आहे. ही वृत्ती देशातून आणि महाराष्ट्रातून नष्ट झालीच पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT