Shivsena Shinde Group: मुख्यमंत्री शिंदेंची शिवसेना महायुतीचे जागावाटपाचे गणित बिघडणार?

Eknath Shinde politics, after NCP Ajit Pawar, Shivsena Shinde Group also claim on 7 constituencies-विधानसभा निवडणूक जवळ येताच मतदार संघाच्या मागणीमुळे नाशिक जिल्ह्यात सत्ताधारी महायुतीत वाढता दुरावा
Ajit Pawar,Eknath Shinde & Devendra Fadanvis
Ajit Pawar,Eknath Shinde & Devendra FadanvisSarkarnama
Published on
Updated on

Shivsena Vs BJP: दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने बारा जागांची मागणी केली होती. त्या पाठोपाठ शिवसेना मुख्यमंत्री शिंदे गटानेही तोच मार्ग अवलंबला आहे. त्यामुळे महायुतीत नेमके उमेदवार किती, अशी चर्चा सुरू झाली आहे. यात भाजपची डोकेदुखी मात्र वाढली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गेले दोन दिवस नाशिक जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी पक्षाच्या नेत्यांनी जवळपास सर्वच मतदारसंघांमध्ये निवडणूक लढविण्याची तयारी असल्याचा दावा केला. त्यामुळे जिल्ह्यात सहा आमदार असलेल्या या पक्षाने अन्य सहा जागांवर दावा केला होता.

सहकारी पक्षांच्या मतदारसंघांच्या दाव्यांमुळे भाजप नेत्यांच्या कपाळावरील अख्या वाढल्या आहे. त्याला कारण म्हणजे आता शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटानेही तोच मार्ग स्वीकारला आहे. या पक्षाने नाशिक जिल्ह्यात दोन आमदार असताना अन्य चार मतदारसंघांवर दावा केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार असलेल्या देवळाली, दिंडोरी, निफाड, सिन्नर तसेच शिवसेना शिंदे गटाचे आमदार असलेल्या पालकमंत्री दादा भुसे यांचा मालेगाव बाह्य आणि नांदगाव (आमदार सुहास कांदे) मतदारसंघावर दावा केला आहे. देवळाली आणि नांदगाव असे सहा मतदारसंघ या पक्षाला हवे आहे.

Ajit Pawar,Eknath Shinde & Devendra Fadanvis
Amol Shinde Politics: भाजपच्या डावपेचांनी शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील संकटात

सध्या विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्ष आणि इच्छुकांकडून सुरू आहे. जागा वाटपाबाबत कुठलेही स्पष्ट संकेत नाहीत. मात्र किमान ज्या पक्षाचे आमदार आहेत, तो मतदार संघ त्या पक्षाला सोडण्यात येईल असे सूत्र आहे. महायुतीच्या घटक पक्षांना मात्र हे सूत्र मान्य दिसत नाही. त्यामुळे शिंदे गट आणि अजित पवार गटाकडून उत्साही पदाधिकारी अनेक मतदारसंघावर दावा करीत आहेत.

महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा सुरू झाल्यावर त्यात भारतीय जनता पक्ष हा मोठा भाऊ असणार आहे. अन्य पक्षांना किती व कोणत्या जागा द्यायच्या हे भाजपच्या मर्जीवर अवलंबून आहे. त्यामुळेच राजकीय दबाव निर्माण करण्यासाठी शिंदे गटाने अनेक जागांवर दावा केल्याचे बोलले जाते.

Ajit Pawar,Eknath Shinde & Devendra Fadanvis
Girish Mahajan Politics: मंगेश चव्हाण यांना पाठबळ देत गिरीश महाजन टिपणार एका गोळीत तीन सावज!

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमी महायुतीचे घटक पक्ष प्रत्यक्ष निवडणुकीआधीच जागा वाटपामध्ये एकमेकांची परीक्षा घेतील, असे दिसू लागले आहे. नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने भाजपच्या अडचणीत भर घातली आहे

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com