Ujjwal Nikam News  Sarkarnama
देश

Ujjwal Nikam News : 'पूनम महाजन तुमच्या प्रचारात का दिसत नाहीत?' निकम म्हणाले, "नाराजीचा सूर..."

Chetan Zadpe

Mumbai News : उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनाता पार्टी महायुतीचे अ‍ॅड. उज्वल निकम यांच्या प्रचाराला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. विलेपार्ले पश्चिमेकडील इरला नाका प्रेम नगर परिसरात आज त्यांची प्रचार रॅली निघाली. या रॅलीमध्ये धनगर बांधवांकडून त्यांना घोंगडी आणि काठी भेट देण्यात आली. मात्र या प्रचारात भाजप नेते पूनम महाजन दिसून आल्या नाहीत. यामुळे त्या नाराज आहेत, अशा चर्चा सुरु झाल्या . (Latest Marathi News)

पूनम महाजन (Poonam Mahajan) तुमच्या प्रचारात कुठेच दिसून येत नाहीत. उमेदवारी डावलल्याने त्या नाराज आहेत का? महाजन यांच्या नाराजीबाबत विचारले असता निकम यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. निकम म्हणाले, "पूनम महाजन या नाराज नाहीत. त्यांचा मला फोन आला होता. फोन करुन त्यांनी सांगितलं की, मी प्रचारात नंतर सहभागी होईन. कारण त्या आजारी आहेत, त्यामुळे नाराजीचा सूर असं काही नाही," असे निकम म्हणाले.

(राजकारणातील महत्वाच्या बातम्यांच्या अपडेटस॒साठी सरकारनामाचे अधिकृत WhatsAppचॅनेल फॉलो करा)

निकम यांचं कार्यक्षेत्र मुंबई -

उत्तर मध्यमुंबईतून (Mumbai) भाजपतर्फे राज्याचे माजी विशेष सरकारी वकिल उज्वल निकम यांची उमेदवारी बहाल करण्यात आलेली आहे. ॲड.उज्वल निकम यांनी राज्यातील मुंबई बॉम्बस्फोट खटला, मुंबई हल्ला प्रकरणाचा खटला तसेच इतर महत्वाच्या खटल्यात राज्याचे विशेष सरकारी वकिल म्हणून काम पाहिले आहे. त्यामुळे त्यांचे कार्यक्षेत्र मुंबई हेच राहिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT