UK Election Update : भारतातील लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 400 पारचा नारा दिला होता. पण प्रत्यक्षात एनडीएला 300 चा आकडाही गाठता आला नाही. मात्र, ब्रिटनमधील लेबर पार्टीने ‘अब की बार 400 पार’ जात सत्ताधाऱ्यांचा दारुण पराभव केला आहे.
भारतात मोदींना जे जमलं नाही ते लेबर पार्टीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार किअर स्टारमर यांनी करून दाखवलं आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार लेबर पार्टीने 650 पैकी 405 जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. बहुमताचा आकडा 326 हा असून विद्यमान पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या कंजर्वेटिव्ह पार्टीला जेमतेम 111 जागांवर विजय मिळवता आला आहे.
लिबरल डेमोक्रेट्स या पक्षाला 67, स्कॉटिश नॅशनल पार्टीला सात तर रिफॉर्म यूके पक्षाने चार जागा जिंकल्या आहेत. ग्रीन पक्षाला अद्याप एकही जागा मिळवता आलेली नाही. पंतप्रधानपद जाणार असले तरी ऋषी सुनक यांनी निवडणूक जिंकली आहे. माजी पंतप्रधान लिज ट्रस यांचा मात्र पराभव झाला आहे. त्या 2022 मध्ये केवळ सहा आठवडे पंतप्रधान होत्या.
दरम्यान, दणदणीत विजयानंतर मीडियाशी बोलताना किअर स्टारमर म्हणाले, आम्ही करून दाखवलं आहे. आपण याचसाठी लढाई लढली होती. आता याचे निकाल सर्वांसमोर आहेत. आता बदलाचे वारे वाहू लागले आहेत. ही बदलेली लेबर पार्टी असून देशाच्या सेवेसाठी सज्ज आहे.
सुनक यांनी पराभव मान्य करत स्टारमर यांनी विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे. आपल्यावर विश्वास दाखवल्याबद्दल त्यांनी ब्रिटनच्या जनतेचे आभारही मानले आहेत. तसेच पुढेही देशाची सेवा करत राहणार असल्याचे म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.