Volodymyr Zelensky
Volodymyr Zelensky Sarkarnama
देश

ऐतिहासिक क्षण; रशियानं पुकारलेल्या युध्दानं युक्रेनला लागली मोठी लॉटरी

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : रशियाने (Russia) युक्रेनविरूध्द पुकारलेल्या युध्दाचा मंगळवारी सहावा दिवस आहे. एकीकडं रशियाचं सैन्य राजधानी कीवच्या दिशेनं आगेकूच करत असताना युक्रेनला (Ukraine) मोठी लॉटरी लागली आहे. युरोपियन संघाने रशियाच्या हल्ल्याचा निषेध करत युक्रेनच्या बाजून उभे राहण्याचा निर्णय़ घेतला आहेत. (Russia-Ukraine War Update)

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर जेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांनी सोमवारी युक्रेनला यरोपियन संघामध्ये (European Union) सहभागी करून घेण्यासाठी अर्ज केला होता. या अर्जाला मंगळवारी युरोपीय संघाने मंजूदी दिली आहे. युक्रेनसाठी ही महत्वाची घडामोड मानली जात आहे. युरोपियन संघाने विशेष प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार युक्रेनला युरोपियन संघात सहभागी करून घेण्यासाठी संसदेत मतदान होणार आहे.

दरम्यान, जेलेन्स्की यांनी सोमवारी याबाबतच्या अर्जावर सही केली होती. युक्रेनने याला ऐतिहासिक क्षण म्हटलं होतं. त्यानंतर जेलेन्स्की यांनी मंगळवारी युरोपियन संसदेत भाषण दिले. यावेळी त्यांनी म्हटलं की, ‘रशियातील सर्वसामान्य नागरिकांवर क्षेपणास्त्र डागण्यात आली. हे कुणीच माफ करणार नाही, ना कुणी विसरेल. आम्ही आमच्या स्वातंत्र्याची लढाई लढत आहोत. या लढाईत युरोपियन संघ आमच्यासोबत आहे.’ या भाषणानंतर संसदेत उपस्थितीत प्रतिनिधींनी जेलेन्स्की यांच्या समर्थनार्थ उभे राहत जोरदार टाळ्या वाजवल्या.

भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू

युक्रेनमधील दुसऱ्या क्रमांकाचे शहर असलेल्या खारकीव्हमध्ये (Kharkiv) रशियाने जोरदार हल्ला चढवला आहे. या हल्ल्यात वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. या विद्यार्थ्याचे नाव नवीन शेखरप्पा ग्यानगौडर (Naveen Shekharappa Gyanagoudar) असल्याची प्राथमिक माहिती आहे. नवीन बावीस वर्षांचा होता. युक्रेनमधील (Ukraine) खारकीव्ह या शहरात तो वैद्यकीय पदवीचे चौथ्या वर्षाचे शिक्षण घेत होता.

कीवमधून (Kyiv) तातडीने बाहेर पडण्याचे आवाहन भारतीय दुतावासाकडून (Indian Embassy) अडकलेल्या भारतीय नागरिकांना मंगळवारी दुपारी बारा वाजता करण्यात आले आहे. पण त्याआधीच सकाळी खारकीव्हमध्ये नवीनचा मृत्यू झाल्याचे समजते. रशियाच्या बॉम्बहल्ल्याचा नवीन बळी ठरला आहे. प्राथमिक माहितीनुसार, नवीन हा एका सुपर मार्केटमध्ये काही वस्तू खरेदी करण्यासाठी गेला होता. यावेळी सुपर मार्केटबाहेर रांग लागली होती. (Russia-Ukraine War)

नवीन रांगेत उभा असतानाच जवळच झालेल्या बॉम्बहल्ल्यात नवीनचा मृत्यू झाला. तर खारकीवमधील विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, रशियन सैन्याच्या गोळीबारात नवीचा मृत्यू झाला आहे. तसेच नवीन हा रेल्वे स्थानकाकडे जात असताना त्याचा मृत्यू झाल्याचेही सांगितले जात आहे. याबाबत अद्याप अस्पष्टता आहे. पण रशिया-युक्रेन युध्दामध्ये भारतीयाचा हा पहिला बळी ठरला आहे. त्यामुळे भारतासाठी ही मोठी नामुष्की ठरली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनीही दुजोरा दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT