Vladimir Putin  sarkarnama
देश

आमच्याकडे अणुबॅाम्ब आहे, हस्तक्षेप करु नका ; रशियाची अमेरिकेला धमकी

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी 'युक्रेन आणि आमच्या वादात अन्य देशांनी पडू नये,' अशी धमकी दिली आहे.

सरकारनामा ब्युरो

कीव : युक्रेनवर रशियाचे आक्रमण सुरुच आहे. आता रशियाचे लष्कर युक्रेनवर (Ukraine)ताब्या मिळविण्यासाठी पुढे सरसावले आहेत. तर दुसरीकडे रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी 'युक्रेन आणि आमच्या वादात अन्य देशांनी पडू नये,' अशी धमकी दिली आहे. आमच्या वादात हस्तक्षेप केला तर त्याचे परिणाम भोगावे लागतील,असा इशारा पुतीन यांनी दिली आहे.

पुतीन यांनी अमेरिकेसह सर्वच देशांना इशारा दिला आहे. आमच्याकडे अणुबॅाम्ब असल्याची धमकी रशियाने दिली आहे. 'आवश्यकता पडली तर आम्ही त्याचा उपयोग करु,' अशी धमकी रशियाने दिली आहे.

युक्रेन-रशिया युध्दाच्या तिसऱ्या दिवशी रशियाचे सैन्य युक्रेनची राजधानी कीवमध्ये दाखल झाले आहेत. शुक्रवारी रात्री गोळीबारांच्या आवाजाचे परिसरात भीती निर्माण झाली आहे. अखेर युक्रेन सध्या माघार घेण्याच्या तयारीत आहे.

युक्रेनचे अध्यक्ष वलोडिमिर जेलेंस्की यांनी शुक्रवारी एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले की आम्ही रशियाचा सामना करण्यासाठी सज्ज आहोत. देशाचे सोडून कुठेही जाणार नाही. आम्हाला काही देशांनी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी ई-मेल पाठवून मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. याबरोबरच काही सूचनाही दिल्या आहेत.

शुक्रवारी भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी युक्रेनच्या परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. भारत-युक्रेन संबधाचा उपयोग करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

युक्रेनमध्ये युद्धामुळे परिस्थिती बिकट होत चालली आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत विविध देश या समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत. या संदर्भात सुरक्षा परिषदेच्या बैठकीत भारताने या युद्धाचानिषेध केला असून युक्रेनमधील अलीकडच्या घडामोडींनी भारत खूपच अस्वस्थ असल्याचे म्हटले आहे. हिंसा आणि शत्रुत्व ताबडतोब संपवण्यासाठी सर्व प्रयत्न केले जावेत अशी आमची विनंती आहे. मानवी जीवनाच्या किंमतीवर कोणताही उपाय शोधला जाऊ शकत नाही, अशी भूमिका भारताने मांडली आहे. (Russia-Ukraine War News updates)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT