युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी मोदी सरकारचा हा असेल प्लॅन बी

पोलंड आणि रोमनिया येथे युक्रेनच्या सीमेवर भारतीय नागरिकांसाठी सुविधा केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. युक्रेनमध्ये दोन सुविधा केंद्र सुरु करण्यात आले आहे.
  Narendra Modi
Narendra Modisarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : रशियाने युक्रेनवर (ukraine) केलेल्या हल्ल्यामुळे तेथील भारतीय नागरिक संकटात सापडले आहेत. शिक्षण व नोकरीसाठी गेलेले भारतीय युद्धामुळं अडचणीत सापडले आहेत. मोदी सरकार (modi government) त्यांना परत मायदेशी आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. मोदी सरकारने युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी नवीन योजना आखली आहे.

रशियाच्या (russia) हल्ल्यामुळे युक्रेनची राजधानी कीवचे विमानतळ ठप्प झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणण्यासाठी गेलेले विमानाला त्यांना न घेताच तसेच परतावे लागले. मोदी सरकारने युक्रेनच्या पश्चिम सीमेवरील देशाच्या हद्दीतून या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी योजना आखली आहे.

याबाबत परराष्ट्र मंत्रालय सचिव हर्ष श्रृंगला यांनी ही माहिती दिली. युक्रेनजवळील पोलंड, रोमानिया, स्लोवाकिया आणि हंगेरी या देशातून भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यासाठी या देशात वेगवेगळे दहा पथक युक्रेनला रवाना झाले आहेत.

हंगेरी येथील भारतीय दुतावासातील कर्मचारी युक्रेनच्या सीमेवर जोहांवी येथे रवाना झाले आहेत. पोलंड आणि रोमनिया येथे युक्रेनच्या सीमेवर भारतीय नागरिकांसाठी सुविधा केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. युक्रेनमध्ये दोन सुविधा केंद्र सुरु करण्यात आले आहे. या माध्यमातून भारतीय नागरिकांना मायदेशी परत येण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.

युक्रेनमध्ये अंदाजे २० हजार भारतीय नागरिक आहेत. यातील ४ हजार जण गेल्या दहा दिवसात भारतात आले आहेत. महाराष्ट्र, बिहार, केरळ, तामिळनाडू येथील नागरिक प्रामुख्याने युक्रेनमध्ये अडकले आहेत. त्यांना मायदेश आणण्यासाठी या राज्याकडून मोदी सरकारवर दबाब आणण्यात येत आहे. कॉग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही याबाबत केंद्र सरकारने त्वरीत उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

  Narendra Modi
Russia-Ukraine War:पहिल्या दिवशी युद्धात १३७ जणांचा मृत्यू ; ७० लष्करी तळ उद्ध्वस्त

केरळ, तामिळनाडूंच्या मुख्यमंत्र्यांना परराष्ट्रमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मुंबई, नगर, नाशिक येथे विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. त्यांच्या सुटकेसाठी स्थानिक प्रशासन परराष्ट्र मंत्रालयाच्या संपर्कात आहेत. नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रीमंडळाला याबाबतची उपाययोजना करण्यास सांगितले आहे.

युक्रेनने या युद्धामध्ये मध्यस्थी करण्याची मागणी भारताकडे केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्याशी चर्चा केली. यावेळी रशियाला चर्चेतून वाद मिटवा हिंसेचा मार्ग सोडा, असे मोदी पुतीन यांना म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com