UmaShanakr Yadav, Atul Bhatkhalkar and Ram Satpute
UmaShanakr Yadav, Atul Bhatkhalkar and Ram Satpute Sarkarnama
देश

राष्ट्रवादीच्या उत्तर प्रदेश प्रदेशाध्यक्षांनी भातखळकर अन् सातपुतेंना पाडलं तोंडावर

सरकारनामा ब्युरो

लखनौ : उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीमुळे (UP Election 2022) राजकारण तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) या निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. समाजवादी पक्षासोबत (Samajwadi Paty)) आघाडीची घोषणा झाल्यानंतर राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर झाला होता. या जागेबाबत सोशल मीडियावरील चर्चेचा आधार घेऊन बोलणारे भाजपचे (BJP) आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) आणि राम सातपुते (Ram Satpute) हे तोंडावर पडले आहेत.

राष्ट्रवादीला मिळालेली ही जागा काढून घेतल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. याचा आधार घेत भातखळकर आणि सातपुते यांनी राष्ट्रवादीवर टीका केली होती. भातखळकर यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांनाही यात ओढले होते. त्यांनी ट्विटरवर म्हटले होते की, सपाने शरद पवार यांच्या यांच्या राष्ट्रीय पक्षाला उत्तर प्रदेशात दिलेली एकमेव जागा परत घेतली आहे. हा अपमान सहन करता येण्यासारखा नाही. त्यांची उंची समजावून सांगण्यात राऊत पुन्हा कमी पडलेले दिसतात.

याला अपमान नाही तर लायकी दाखवली म्हणतात, असा टोला राम सातपुते यांनी ट्विटरवर लगावला होता. आता ही समाजवादी पक्षाने राष्ट्रवादीच्या वाट्याची जागा काढून घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. याचबरोबर राष्ट्रवादीला मिळालेली ही एकमेव जागा नसून, आणखीही जागा मिळणार आहेत, हेसुद्धा समोर येत आहे. यामुळे भातखळकर आणि सातपुते हे तोंडावर पडल्याचे चित्र आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष उमाशंकर यादव यांनी म्हटले आहे की, सोशल मीडियात सुरू असलेली चर्चा खोटी आहे. आमची समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यासोबत लखनौ येथे पुढील जागावाटपाबाबत चर्चा करण्यासाठी बैठक होणार आहे. या बैठकीला समाजवादी पक्षासोबत आघाडी करणारे पक्ष उपस्थित असणार आहेत. त्या सर्वच पक्षांचे नेते याठिकाणी उपस्थित असतील. या बैठकीत प्रामुख्याने इतर जागांबाबत अखिलेश यादव यांच्या सोबत चर्चा होणार आहे.

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस के. के. शर्मा (K. K. Sharma) हे निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. त्यांना अनूपशहर (Anupshahar) मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. समाजवादी पक्षाकडून त्यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष उमाशंकर यादव यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर के. के. शर्मा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT