Rajnath Singh Sarkarnama
देश

Rajnath Singh News : आईच्या अंत्यविधीसाठीही पॅरोलवर सोडलं नाही; राजनाथ सिंह झाले भावूक

Emergency in India : आणीबाणीच्या काळात राजनाथ सिंह यांना अटक करण्यात आली होती. या काळातील आठवणींना त्यांनी उजाळा दिला आहे.

Rajanand More

New Delhi News : केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh News) यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. आणीबाणीच्या काळात आईच्या निधनानंतर अंत्यविधीसाठी उपस्थित राहता आले नाही. जेलमध्ये असताना तत्कालीन काँग्रेस सरकारने आपल्याला पॅरोलवर सोडले नाही, असा दावा सिंह यांनी केला आहे. वयाच्या २३ व्या वर्षी आपल्याला जेलमध्ये टाकण्यात आले होते, असेही त्यांनी म्हटले आहे.

राजनाथ सिंह यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत आणीबाणीच्या काळातील आठवणींना उजाळा दिला आहे. यावेळी ते भावनिकही झाले. आणीबाणी काळात काँग्रेसने (Congress) हुकुमशाही केल्याचा दावा करत त्यांनी जोरदार टीका केली.

ते म्हणाले, आईच्या निधनानंतर अंत्यविधीला उपस्थित राहण्यासाठी आपल्याला पॅरोल दिला नाही आणि आज काँग्रेस आम्हाला हुकुमशाह म्हणत आहे. माझी आई 27 दिवस रुग्णालयात उपचार घेत होती. तिला मी साधे भेटूही शकलो नाही, असेही राजनाथ सिंह यांनी सांगितले.

काँग्रेसकडून मोदी सरकारवर (Modi Government) सातत्याने हुकुमशाहीचा आरोप केला जातो. त्यावर राजनाथ सिंह यांनी टीका केली. ‘ज्यांनी आणीबाणीच्या माध्यमातून हुकूमशाही लादली तेच आता आम्हाला हुकूमशाही आणल्याचे म्हणत आहेत. आणीबाणीच्या काळात मी १८ महिने तुरुंगात होतो,’ असे ते म्हणाले.

काँग्रेसच्या जाहीरनाम्यावरही राजनाथ सिंह यांनी टिका केली. ते म्हणाले, काँग्रेस सत्तेत असताना किती हजार चौरस किलोमीटर जमीन चीनने बळकावली, यावर मी बोलू इच्छित नाही. पण मी देशातील नागरिकांना आश्वासित करतो की, कुणीही देशाची एक इंचही जागा आता काबीज करू शकत नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पाकिस्तानला ते सक्षम असल्याचे वाटत नसले तर भारत (India) दहशतवाद थांबवण्यासाठी मदत करायला तयार असल्याचे विधानही राजनाथ सिंह यांनी केले. दहशतवादाच्या माध्यमातून पाकिस्तान भारताला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचे परिणामही भोगावे लागतील, असा इशाराही राजनाथ सिंह यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT