Lok Sabha Election 2024 : नेते, कार्यकर्त्यांसोबत ‘रोबोट’नेही उडवला प्रचाराचा धुरळा  

AI Technology : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पहिल्यांदाच एआय तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. यामाध्यमातून दिवंगत नेत्यांचे व्हिडीओ तयार करून मतदारांना भावनिक करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
Robot in Election Campaign
Robot in Election CampaignSarkarnama
Published on
Updated on

Tamil Nadu News : लोकसभा निवडणुकीतील (Lok Sabha Election 2024) पहिल्या टप्प्याचे मतदान आठ दिवसांवर आले आहे. देशभरात नेते, कार्यकर्त्यांकडून प्रचाराचा धुरळा उडवला जात आहे. आता त्यामध्ये रोबोटचीही भर पडली आहे. चक्क रोबोट रस्त्यावर उतरून मतदारांना मतांचा जोगवा मागत आहे. त्यामध्ये कृत्रिम बुध्दिमत्ता म्हणजेच आर्टिफिशियल इंटिलिजन्सचा वापरही केला जात असून हा फंडा मतदारांनाही आकर्षित करत आहे.

तमिळनाडूतील (Tamil Nadu) धर्मपुरी लोकसभा मतदारसंघात हा रोबोट (Robot in Election Campaign) आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. एआयएडीएमके (AIADMK) पक्षाचे उमेदवार डॉ. अशोकन यांनी प्रचारात रोबोटला उतरवले आहे. मतदारसंघात विविध भागांत गर्दीच्या ठिकाणी या रोबोटचा प्रचारासाठी वापर केला जात आहे. लोकांनाही याचे नवल वाटत असल्याने अशोकन यांना फायदा होत असल्याचा दावा केला जात आहे.

Robot in Election Campaign
PM Narendra Modi : रंग लावून डोक्याचे केस पांढरे करतो, कारण..! टॉप गेमर्ससोबत मोदींच्या पहिल्यांदाच गप्पा

रोबोटवर पक्षाची शॉल टाकण्यात आली आहे. रोबोटमध्ये एक स्क्रीन असून त्यावर एमजीआर आणि जयललिता यांचा संदेश चालवला जात आहे. त्यामध्ये ते पक्षाला मतदान करण्याचे आवाहन मतदारांना करताना दिसत आहेत. त्यासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. पक्षाच्या यापुर्वीच्या सरकारने केलेल्या कामांची माहितीही त्यामध्ये दिली जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जयललितांच्या आवाजामुळे मतदार भावनिक

रोबोटमधील स्क्रीमवर जयललिता दिसतात. त्याच बोलत असल्याचा भास व्हिडिओमध्ये होत आहे. एआय तंत्रज्ञानाचा (AI Technology) वापर करून हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. जयललितांना मानणारा मोठा वर्ग तमिळनाडूमध्ये आहे. व्हिडिओच्या माध्यमातून त्या मतदारांना पक्षाला मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. तसेच तमिळ लोकांचे अधिकार आणि हितांचे संरक्षण करण्याचे आश्वासन देतानाही दिसत आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ भावनिक मुद्दाही बनला आहे.

रोबोटमध्ये एक ट्रे असून त्यावर प्रचाराची पत्रके, उमेदवारीची माहिती असे साहित्य आहे. ही पत्रकेही लोक वाचताना दिसत आहे. उमेदवाराकडून याबाबतचे व्हिडिओ सोशल मीडियात टाकले जात आहेत. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. उमेदवाराने प्रचारात केलेला हा प्रयोग भलताच यशस्वी होताना दिसत आहे.

Robot in Election Campaign
Delhi Liquor Scam Case : केसीआर यांच्या आमदार मुलीला ‘सीबीआय’कडून अटक

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com