CRPF Security to VIP Leaders Sarkarnama
देश

Security of Leaders : अडवाणी, योगींसह देशातील 9 VIP नेत्यांच्या सुरक्षेत मोठा बदल; कोण आहेत हे नेते?  

Rajanand More

New Delhi : देशातील बड्या नेत्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत मोठा बदल करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतर सहा नेत्यांच्या सुरक्षेत बदल करण्यात आला आहे. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सीआरपीएफ वर सोपवण्यात आली आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाने काही महिन्यांपूर्वीच संसदेतील सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी सीआरपीएफच्या व्हीआयपी सुरक्षा विभागाकडे सोपवली आहे. व्हीआयपी नेत्यांच्या सुरक्षेसाठी एनएसजी कमांडो नेमले जातात. पण आता झेड प्लस सुरक्षेचे कवच असलेल्या नऊ नेत्यांना एनएसजी ऐवजी सीआरपीएफच्या जवानांची सुरक्षा असेल. एनएसजी कमांडोंचा वापर केवळ दहशतवाद्यांशी सामना करण्यासाठी केला जाणार असल्याचे समजते.

या नेत्यांचा समावेश

राजनाथ सिंह, योगी आदित्यनाथ यांच्यासह बसपाच्या प्रमुख मायावती, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल, छत्तीसगडचे माजी मुख्यमं६ रमन सिंह, जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद व फारुख अब्दुल्ला आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना सीआरपीएफची सुरक्षा असेल. पुढील महिन्यापासून हे बदल अपेक्षित असल्याचे वृत्त ‘पीटीआय’ने दिले आहे.

दरम्यान, संसदेमध्ये घुसखोरी झाल्यानंतर सुरक्षेचा मुद्दा चांगलाच गाजला होता. त्यानंतर गृह मंत्रालयाने सीआरपीएफच्या जवानांचा विशेष ट्रेनिंग देत स्वतंत्र बटालियन तयार केली होती. याच बटालियनवर संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी टाकण्यात आली आहे. आता सीआरपीएफच्या याच व्हीआयपी सिक्युरिटी विंगकडे या नऊ नेत्यांच्या सुरक्षेची जबाबदारी असेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT