Milkipur Election : भाजपची चूक, मिल्कीपूरमध्ये पोटनिवडणूक घेण्याचे आयोगाने टाळले; देशातील एकमेव मतदारसंघ आमदाराविना?

BJP Election Commission Bypolls : मिल्कीपूर हा अयोध्या जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ असून तिथेही पोटनिवडणूक लागण्याची शक्यता होती.  
Milkipur Assembly Election
Milkipur Assembly ElectionSarkarnama
Published on
Updated on

Uttar Pradesh Politics : केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले. त्यासोबत देशभरातील तब्बल 48 विधानसभा आणि दोन लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकांचीही घोषणा केली. मात्र, देशातील एकमेव विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक घेण्याचे आयोगाने टाळले आहे.

अयोध्या जिल्ह्यातील मिल्कीपूर मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर होणेही अपेक्षित होते. त्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारीही केली होती. पण आयोगाकडून या मतदारसंघाचा समावेश केला नाही. त्यामुळे सध्यातरी या मतदारसंघात पोटनिवडणूक होणार नसल्याने 23 नोव्हेंबरनंतर मिल्कीपूर हा आमदार नसलेला एकमेव मतदारसंघ ठरू शकतो.

Milkipur Assembly Election
Surinder Kumar Chaudhary : भाजप प्रदेशाध्यक्षांचा पराभव करणाऱ्या हिंदू नेत्याला मोठा मान; कोण आहेत सुरिंदर चौधरी?

आयोगाने केला खुलासा

मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यामागचे कारण आयोगाने सांगितले आहे. समाजवादी पक्षाचे खासदार अवदेश प्रसाद हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. त्यांनी लोकसभा निवडणुकीआधी आमदारकीचा राजीनामा दिल्याने या मतदारसंघात पोटनिवडणूक होणे अपेक्षित होते. मात्र, 2022 मध्ये भाजपचे उमेदवार गोरखनाथ बाबा यांनी अवधेश प्रसाद यांच्याविरोधात एक याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणी प्रलंबित असल्याचे कारण देत आयोगाने पोटनिवडणूक घेण्याचे टाळले.

लोकसभा निवडणुकीत अवधेश प्रसाद विजयी झाल्यानंतरही गोखनाथ बाबा यांनी याचिका मागे घेतली नाही. त्यामुळे याबाबतचा अहवाल निवडणूक अधिकारी आणि राज्य निवडणूक आयोगाकडून केंद्रीय आयोगाकडे गेला. त्याआधारे आयोगाने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

Milkipur Assembly Election
Haryana CM: अमित शहांनी सोडवला हरियाणाचा तिढा; मुख्यमंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब

भाजपने जाणीवपूर्वक टाळले

अयोध्येचा समावेश असलेल्या फैजाबाद लोकसभा मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराचा अवधेश प्रसाद यांनी पराभव केला आहे. याच अयोध्येमध्ये मिल्कीपूर मतदारसंघही आहे. त्यामुळेच भाजपने जाणीवपूर्वक पोटनिवडणूक घेण्याचे टाळल्याचा आरोप समाजवादी पक्षाने केला आहे.

याचिका मागे घेणार

दरम्यान, पोटनिवडणूक जाहीर न झाल्याने गोरखनाथ बाबा यांनी एक-दोन दिवसांत याचिका मागे घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. याचिका मागे घेतल्यानंतर याबाबत निवडणूक आयोगालाही कळवले जाईल, असे त्यांच्या वकिलांकडून सांगण्यात आले. मात्र, त्यानंतरही आयोगाकडून निवडणूक जाहीर केली जाणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.   

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com