BJP Manifesto Sarkarnama
देश

Jammu and Kashmir : काश्मीरमध्येही ‘लाडकी बहीण’! भाजपच्या जाहीरनाम्यात अनेक मोठ्या घोषणा...

Assembly Election 2024 BJP Amit Shah : अमित शाह यांनी शुक्रवारी भाजपचा जाहीरनामा प्रसिध्द केला. यावेळी त्यांनी कलम ३७० इतिहासजमा झाल्याचे ठणकावून सांगितले.

Rajanand More

BJP Manifesto : जम्मू आणि काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून शुक्रवारी जाहीरनामा प्रसिध्द करण्यात आला. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काश्मीरमध्ये कलम 370 आता इतिहासजमा झाले असून ते पुन्हा कधीच येणार नाही, असे ठणकावून सांगितले.

जाहीरनाम्यामध्ये भाजपकडून काश्मीरसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. रोजगार, पर्यटन, ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. प्रत्येक घरातील ज्येष्ठ महिलेला दरवर्षी 18 हजार म्हणजे दर महिन्याला दीड हजार देण्याची घोषणा करण्यात आली आहे. मात्र, या योजनेला कोणतेही नाव देण्यात आलेले नाही. महाराष्ट्रातही लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जात आहेत.

दरम्यान, यावेळी बोलताना शाह म्हणाले, 1947 पासूनच जम्मू-काश्मीर यांच्या हृदयाच्या जवळ आहे. काश्मीर हा भारताचे अंग होते, आहे आणि नेहमीच राहील. इतर राजकीय पक्ष तुष्टीकरणाचे राजकारण करत आहेत. विभाजनासाठी ते जबाबदार आहेत.

मागील दहा वर्षांचा इतिहास सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल, कलम 370 च्या भीतीमुळे विभाजनकारी विचारांसमोर सरकार झुकत होते. पण आता कलम 370 आणि 35 ए इतिहास बनले आहेत. काश्मीर आता विकास आणि प्रगतीपथावर आहे, असे शाह यांनी सांगितले.

भाजपच्या जाहीरनाम्यातील महत्वाच्या घोषणा –

-    प्रत्येक घरातील ज्येष्ठ महिलांना वर्षाला 18 हजार रुपये देणार.

- कश्मिरी पंडितांच्या पुनर्वसनासाठी योजना.

-    उज्ज्वला लाभार्थ्यांना दोन मोफत गॅस सिलिंडर.

-    पाच लाख युवकांना रोजगार.

-    प्रगती शिक्षा योजनेअंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दरवर्षी 3 हजार रुपये वाहतूक खर्चापोटी देणार.

-    यूपीएससी आणि जम्मू-काश्मीर लोकसेवा आयोगाच्या परीक्षार्थींना दोन वर्षांसाठी दहा हजार रुपयांची कोचिंग फी देणार.

-    ग्रामीण भागातील उच्च माध्यमिक शाळांतील विद्यार्थ्यांना लॅपटॉप.

-    जम्मूसाठी प्रादेशिक विकास मंडळाची स्थापना.

-    जम्मू, काश्मीर व्हॅली आणि दल सरोवरात पर्यटनला चालना देणार.

-    अटल आवास योजनेअंतर्गत भूमिहिनांसाठी घर.

-    सरकारी नोकरीत अनुसूचित जाती आणि जमातींमध्ये पदोन्नतीत आरक्षण दिले जाईल.

-    जम्मू आणि काश्मीरमध्ये मेट्रो सेवा सुरू करणार.

-    ग्रामीण भागात 10 हजार किलोमीटरच्या नवीन रस्त्यांची निर्मिती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT