Union Minister Bishweswar Tudu  Sarkarnama
देश

अधिकाऱ्यांना कोंडून मारणाऱ्या केंद्रीय मंत्र्यानं दाखवलं राज्य सरकारकडं बोट!

मोदी सरकारमधील (Modi Government) आणखी एक मंत्री आता अडचणीत आला आहे.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : मोदी सरकारमधील (Modi Government) आणखी एक मंत्री (Union Minister) आता अडचणीत आला आहे. पंचायत निवडणुकांची आचारसंहिता लागू असताना केंद्रीय मंत्र्यांनी दोन वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी ऐकले नाही म्हणून कोंडून मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, हा सर्व प्रकार भाजप कार्यालयात झाला आहे. यावर आता या मंत्र्यांनी थेट राज्य सरकारकडे बोट दाखवले आहे.

ओडिशात 16 ते 24 फेब्रुवारी या कालावधीत पंचायत निवडणुका होत आहेत. यात सत्ताधारी बिजू जनता दल विरुद्ध भाजप असा सामना आहे. यामुळे राजकीय वातावरण तापले असतानाच केंद्रीय राज्यमंत्री विश्वेश्वर टुडू (Vishweshwar Tudu) यांनी अधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ते आदिवासी व जलशक्ती विभागाचे राज्यमंत्री आहेत. त्यांनी आचारसंहिता लागू असताना ओडिशामध्ये दोन सरकारी अधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा गुन्हाही दाखल झाला आहे. यावर टूडू म्हणाले की, हे सर्व बिजू जनता दलाचे कटकारस्थान आहे. राज्यातील पंचायत निवडणुकांआधी आमच्या प्रचार मोहिमेला ब्रेक लावण्याचे काम राज्य सरकार करीत आहे. मी या सगळ्या गोष्टींपेक्षा प्रचारावर लक्ष देत आहे.

टुडू हे ओडिशातील खासदार आहेत. मयूरभंज जिल्ह्यातील बारिपाडा येथील भाजप (BJP) कार्यालयात नुकतीच बैठक बोलावली होती. या बैठकीला जिल्हा नियोजन मंडळाचे सहाय्यक संचालक देवाशिष महापात्रा आणि उपसंचालक अश्विनी मलिक यांना बोलावण्यात आले होते. राज्यात पंचायत निवडणुकांमुळे आचारसंहिता असल्याने या बैठकीला हे सरकारी अधिकारी फायली घेऊन गेले नव्हते. यामुळे संतापलेल्या टु़डू यांनी प्लॅस्टिकच्या खुर्चीने अधिकाऱ्यांना मारहाण करण्यास सुरवात केली. यात महापात्रा यांचा हात मोडला आहे. (Bishweswar Tudu News)

विश्वेश्वर टुडू यांना गेल्या वर्षी जुलैमध्ये झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्रिपद मिळाले. केंद्रीय मंत्र्यांनी भाजपच्या कार्यालयात असलेल्या त्यांच्या कार्यालयात ही बैठक बोलावली होती. टुडू यांनी दरवाजा बंद करून खुर्चीने मारहाण केल्याचा आरोप दोन्ही अधिकाऱ्यांनी केला आहे. या हल्ल्यात महापात्रा यांचा हात मोडला असून, मलिक जखमी झाले आहेत. या दोन्ही अधिकाऱ्यांना बारीपाडा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या दोन्ही अधिकाऱ्यांनी टुडू यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. मंत्र्यांनी केलेल्या मारहाणीत माझा डाव हात मोडला आहे, असे महापात्रा यांनी रुग्णालयातून बोलताना सांगितले. या प्रकरणी बारिपाडा पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दुखापत करणे, गंभीर इजा करणे, शिवीगाळ करणे, धमकावणे आदी आरोपांखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यामुळे मंत्री टुडू आता चांगलेच अडचणीत आल्याचे मानले जात आहे,

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT