Voting Sarkarnama
देश

Jammu and Kashmir Assembly Election : 'जम्मू-काश्मीरमध्ये पुढील महिन्यात विधानसभा निवडणूक' ; 'या' केंद्रीय मंत्र्याचं मोठं विधान!

Mayur Ratnaparkhe

G Kishan Reddy on Jammu and Kashmir Assembly Election : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर आता सगळ्यांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीबाबत केंद्रीयमंत्री जी किशन रेड्डी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. सप्टेंबर महिन्यात जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणूक होणार असल्याचं रेड्डी यांनी सांगितलं आहे.

2014 पासून जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक झालेली नाही. 2019मध्ये कलम 370 हटवण्यात आल्यानंतरर जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेश बनवलं गेलं होतं. याचबरोबर लडाखला जम्मू-काश्मीरपासून वेगळं करण्यात आलं होतं.

केंद्रीयमंत्री जी किशन रेड्डी यांना भाजपने जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्त केलं आहे. सोमवारी जम्मूच्या बाह्य भागात रॅली करताना रेड्डी यांनी, जम्मू-काश्मीरमध्ये विकासाची गती कायम राखण्यासाठी आणि दहशतवादाचे समूळ उच्चाटण करण्यासाठी जनतेला निवडणुकीत भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले. त्यांनी म्हटले की कलम 370 हटवण्यात आल्यापासून जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तान आणि त्यांची गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या हालचालींवर बऱ्याच प्रमाणात अंकुश ठेवता आला आहे.

याशिवाय रेड्डी यांनी असेही म्हटले की, विधानसभा निवडणूक सप्टेंबरमध्ये होईल आणि आम्हाला विश्वास आहे की पूर्ण बहुमताने लोक भाजपला सत्तेत बसवतील. जनतेला हे ठरवायचे आहे की, जम्मू-काश्मीरमध्ये कुणाचं राज्य पाहीजे, ते ज्यांनी कलम 370 पुन्हा लागू करण्याची विधानं केली आहेत की भाजपच्या नेतृत्वातील सरकार ज्या सरकारने जम्मू-काश्मीरला विकास, शांतता आणि समृद्धीच्या नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प केला आहे.

मागील वेळेस जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक 2014मध्ये झाली होती. 19 जून 2018 रोजी भाजपकडून पाठिंबा काढून घेतल्यागेल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी मुख्यमंत्री पदावरून राजीनामा दिला होता आणि त्यानंतर राज्यात राज्यपाल राजवट लागू झाली होती, तसेच पुढे जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवटही लागू करण्यात आली.

यानंतर 5 ऑगस्ट 2019 रोजी केंद्र सरकारने कलम 370 आणि 35(अ)हटवलं आणि जम्मू-काश्मीर राज्याला दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये पुनर्गठित केलं. केंद्र शासित प्रदेश बनल्यापासून जम्मू-काश्मीरमध्ये उपराज्यपालच राज्याचा कारभार पाहत आहेत.

(Edited - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT