Ashish Mishra Sarkarnama
देश

अखेर मंत्रिपुत्र तुरूंगातून बाहेर पण पुढील नव्हे तर मागील दाराने!

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी (Lakhimpur Kheri) येथे केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकऱ्यांना चिरडले होते.

सरकारनामा ब्युरो

लखीमपूर खीरी : राज्यातील ऐन विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) रणधुमाळीतच केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांचा मुलगा आशिष मिश्रा (Ashish Mishra) याची सुटका झाली आहे. त्याने उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) राज्यातील लखीमपूर खीरी (Lakhimpur Kheri) येथे शेतकऱ्यांना चिरडले होते. आशिषला आज तुरुंगाच्या मागील दाराने बाहेर सोडण्यात आले. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय तुरुंग प्रशासनाने घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

मागील आठवड्यात उच्च न्यायालयाने आशिषला जामीन मंजूर केला होता. त्याची तीन लाखांच्या प्रत्येकी दोन जातमुचकल्यांवर सुटका झाली आहे. त्याला शहर सोडून जाण्यास मनाई करण्यात आली आहे. सत्र न्यायालयाने दोन वेळा आशिषचा जामीन फेटाळलला होता. अखेर उच्च न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केला होता. त्याची अखेर आज तुरूंगातून सुटका झाली. इतर कैद्यांप्रमाणे त्याची पुढील दाराने नव्हे तर मागील दाराने सुटका झाली. सुरक्षेच्या कारणास्तव आशिषला मागील दाराने सोडण्यात आले. तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर एसयूव्हीत बसून तो निघून गेला.

या प्रकरणाच्या तपासासाठी नेमलेल्या विशेष तपास पथकाने (SIT) हा पूर्वनियोजित कट असल्याचा निष्कर्ष काढला आहे. या प्रकरणात आशिष मिश्रा याच्यावर आधी खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. हा कट असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हाही दाखल झाला होता. याबाबत एसआयटीने या प्रकरणाची सुनावणी सुरू असलेल्या न्यायालयात अहवाल सादर केला होता. या प्रकरणी एसआयटीने तब्बल 5 हजार पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. आशिष मिश्राने 3 ऑक्टोबरला 4 शेतकरी आणि एका पत्रकाराला चिरडले होते. यानंतर झालेल्या हिंसाचारात तीन जण ठार झाले होते. त्यातील दोन भाजपचे कार्यकर्ते होते.

लखीमपूर खीरी येथे गेल्या वर्षी 3 ऑक्टोबरला शेतकऱ्यांना चिरडण्यात आले होते. या घटनेत चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांचा मुलगा आशिष मिश्राने (Ashish Mishra) हे कृत्य केले होते. या प्रकरणी आशिषला अटक करण्यात आल्यानंतर त्याला जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले होते. या प्रकरणी 13 जणांना अटक झाली होती. यात आशिष मिश्रासह सुमित जयस्वाल, अंकित दास, लतिफ ऊर्फ काले, शेखर भारती, शिशू पाल, सत्य प्रकाश त्रिपाठी, नंदनसिंह बिश्त, आशिष पांडे, मोहित त्रिवेदी, रांकू राणा, धर्मेंद्र आणि लवकुश राणा यांचा समावेश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT