राजकारण तापलं! संजय राऊतांनी सोमय्यांसह त्यांच्या मुलालाही आणलं अडचणीत

किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील या दोघांना तातडीने अटक करावी, अशी मागणी राऊतांनी केली आहे.
Kirit Somaiya and Neil Somaiya
Kirit Somaiya and Neil Somaiya Sarkarnama

मुंबई : निकॉन इन्फ्रा कन्स्ट्रक्शन कंपनी कुणाची आहे? ही कंपनी भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya), त्यांचे कुटुंबीय आणि त्यांचा मुलगा नील यांची आहे. त्यांचा भागीदार पीएमसी बँक गैरव्यवहारातील आरोपी राकेश वाधवा आहे. पीएमसी गैरव्यवहारातील पैशाची गुंतवणूक त्याने केली, असा गंभीर आरोप शिवसेना (Shivsena) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली. किरीट सोमय्या आणि त्यांचा मुलगा नील या दोघांना तातडीने अटक करावी, अशी मागणी राऊतांनी केली आहे.

खासदार राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत सोमय्यांचा पर्दाफाश केला. ते म्हणाले की, निकॉन इन्फ्रा कन्स्ट्रक्शन कंपनी कुणाची आहे? ही कंपनी किरीट सोमय्या, त्यांचे कुटुंबीय आणि त्यांचा मुलगा नील यांची आहे. त्यांचा भागीदार पीएमसी बँक गैरव्यवहारातील आरोपी राकेश वाधवा आहे. पीएमसी गैरव्यवहारातील पैशाची गुंतवणूक त्याने केली. यातून वसई तालुक्यातील गोखीवरे येथे हजारो कोटींचा प्रकल्प उभारण्यात आला. पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणी सोमय्यांनी ब्लॅकमेल करून कोट्यवधीची जमीन घेतली. देवेंद्र लधाणी या फ्रंटमनच्या नावावर ही जमीन घेण्यात आली आणि पैसेही घेण्यात आली. चारशे कोटींची जमीन फक्त साडेचार कोटींना घेण्यात आली. एकूण दोन जमिनी घेण्यात आल्या.दुसरी जमीन सात कोटींनी घेण्यात आली.

Kirit Somaiya and Neil Somaiya
योगीपुराण! चित्रा रामकृष्ण यांच्या हेअरस्टाईलपासून एकत्रित परदेश सहलीपर्यंत

या जमिनीवर जो प्रकल्प उभा आहे, त्या कंपनीचा संचालक नील सोमय्या आहे. निकॉन फेज 1 फेज 2 हे हजारो कोटींचे प्रकल्प उभारले आहेत. हा सगळा पैसा पीएमसी बँकेतील आहे. या प्रकल्पाला पर्यावरण विभागाची मंजुरी नाही. हरित लवादाने यात लक्ष घातल्यास दोनशे कोटींचा दंड होऊ शकतो. यात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ताबडतोब लक्ष घालावे, असे माझे आवाहन आहे. सगळ्या प्रकल्पाचे परवाने रद्द करावेत. पीएमसी गैरव्यवहाराचा तपास करणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेने किरीट अन् नील सोमय्याला ताबडतोब अटक करावी, असेही त्यांनी सांगितले.

Kirit Somaiya and Neil Somaiya
तर धनंजय मुंडे तुरूंगात असते! करूणा शर्मांनी सांगितलं कारण..

पीएमसी गैरव्यवहार आधीच माहिती सोमय्याच्या जवळच्या लोकांनी आधीच पैसे काढून घेतले. हा सोमय्या भाजपचा मुंबईतील चेहरा आहे. तो आता भ्रष्टाचारा विरोधात लढाई लढत आहे. पत्रा चाळीतले पैसेही सोमय्यांच्या कंपनीत गेले. याची सगळी चौकशी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी करावी. हे सगळे मी पाच टक्के सांगितले आहे. बाकीचे पेपर मी ईडीकडे पाठवले आहेत. सोमय्यांचे भ्रष्टाचाराचे सगळे कागद मी तीन वेळा ईडीला पाठवले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com