Katerina Vladimirovna Tikhonova, Maria Vladimirovna Vorontsova
Katerina Vladimirovna Tikhonova, Maria Vladimirovna Vorontsova Sarkarnama
देश

पुतीन यांच्या दोन मुली अडचणीत; अमेरिकेनं मोठा निर्णय घेत केलं लक्ष्य

सरकारनामा ब्युरो

मॉस्को : मागील दीड महिन्यांपासून रशियाकडून युक्रेनवर हल्ला (Russia Ukraine War) सुरूच आहे. याच्या निषेधार्थ अमेरिकेसह युरोपीयन देशांकडून रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांच्यासह त्यांच्या मंत्र्यावर निर्बंध लादले जात आहेत. आता बुधवारी अमेरिकेनं (USA) पुतीन यांच्या दोन्ही मुलांना लक्ष्य केलं. त्याचपमाणे रशियातील (Russia) सर्वात मोठी बँक असलेल्या स्बेर बॅंकेशी संबंधित सर्व व्यवहारांवर स्थगिती लादण्यात आली आहे.

पुतीन यांच्या कॅटरीना व्लादिमीरोवना तिखोनोवा आणि मारिया व्लादिमीरोवना वोरोत्सोवा या दोन मुली आहेत. पुतीना यांचा पैसा लपवण्यात या दोघी मदत करत असल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. त्यामुळे त्यांना अमेरिकन आर्थिक व्यवस्थेतून काढून टाकले आहे. त्यांच्या अमेरिकेतील सर्व मालमत्ताही गोठवण्यात आल्या आहेत. अमेरिकेने यापूर्वीच पुतीन यांच्यावरही असे निर्बंध घातले आहेत.

कॅटरीना ही एक टेक एक्झिक्युटिव असून ती रशियन सरकार आणि सरकारच्या संरक्षणविषयक उद्योगांचे समर्थन करते. तसेच दुसरी मुलगी मारिया ही सरकारी निधीवर चालणाऱ्या विविध मोहिमांचे नेतृत्व करते. तिला जेनेटिक संशोधनासाठी सरकारकडून कोट्यवधी रुपये मिळतात. पुतीन यांच्या देखरेखीखाली ही कामं चालतात, असं सांगितलं जातं. त्यामुळेच अमेरिकेने दोघींवर निर्बंध लादल्याचे वृत्त आहे. पुतीन यांनी या दोन्ही मुलींसह आपल्या कुटुंबाविषयी माध्यमांसमोर कधीही फारसं भाष्य केलं नाही. सत्तेपासून त्यांनी कुटुंबाला नेहमीच दूर ठेवलं आहे.

पुतीन यांच्या या दोन मुलींसह रशियाचे पंतप्रधान मिखाईल मिशुस्चिन, परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह यांची पत्नी आणि मुले, तसेच रशियाच्या सुरक्षा परिषदेचे सदस्य आणि माजी राष्ट्राध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांच्यावर निर्बंध टाकण्यात आले आहेत. ब्रिटननेही रशियावर अनेक निर्बंध लादले असून स्बेर बँकेसोबतच्या सर्व व्यवहारांना स्थगिती दिली आहे. तसेच रशियातील सर्व गुंतवणूक समाप्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

बुचा नरसंहाराचा जगभरातून निषेध

रशियाने युक्रेनची (Ukraine) राजधानी असलेल्या कीवमध्ये (Kyiv) नरसंहार केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे. नागरिकांचे दोन्ही हात मागे बांधून त्यांना गोळ्या घालून मारल्याचा दावा युक्रेननं केला आहे. कीवमधील बुचा परिसरात अशा स्थितीतील अनेक मृतदेह आढळून आले आहेत. त्यामुळे जग हादरून गेलं आहे. रशियाचं सैन्य कीवमधून माघारी फिरलं आहे. त्यानंतर या शहरातील दृष्ट विदारक दिसत आहे. युक्रेन प्रशासनाने केलेल्या दाव्यानुसार, रविवारपासून रशियाचं सैन्य माघाली परत असले तरी त्यांनी केलेल्या गुन्हयांमुळे शहरातील दृष्य एखाद्या भीतीदायक चित्रपटाप्रमाणे दिसत आहे. बुचा परिसरात जवळपास ४१० मृतदेह आढळून आले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT