सदावर्ते जो आदेश देतील त्यानुसार...! एसटी कर्मचाऱ्यांचा जल्लोष पण संप मिटणार का?

कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन, ग्रॅच्युएटीचे लाभ देण्याचे आदेश न्यायालयाने एसटी महामंडळाला दिले आहेत. तसेच त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये, असंही न्यायालयाने आदेशात म्हटलं आहे.
Gunaratna Sadavarte
Gunaratna Sadavartesarkarnama
Published on
Updated on

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांना (ST Employees) गुरूवारी मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) मोठा दिलासा दिला आहे. कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन, ग्रॅच्युएटीचे लाभ देण्याचे आदेश न्यायालयाने एसटी महामंडळाला दिले आहेत. तसेच त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये, असंही न्यायालयाने आदेशात म्हटलं आहे. त्यामुळे आझाद मैदानात आंदोलन करत असलेल्या कर्मचाऱ्यांनी जल्लोष सुरू केला असून आता त्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या आदेशाची वाट पाहत आहेत. (ST Strike)

मागील पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर उच्च न्यायालयाने तोडगा काढला आहे. पण त्यांची प्रमुख मागणी असलेल्या एसटीच्या विलीनीकरणाचे आदेश न्यायालयाने दिलेले नाही. तीन सदस्यीय समितीने ही मागणी फेटाळून लावली आहे. राज्य सरकारनेही न्यायालयाला विलीनीकरण करता येणार नाही, असं स्पष्ट सांगितलं आहे. त्यामुळे न्यायालयानेही त्याबाबतचा आदेश दिलेला नाही. त्यामुळे विलीनीकरण करून देणारच, अशी गर्जना करणारे सदावर्ते आता कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्यास सांगणार की न्यायालयीन लढा सुरूच ठेवणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.

Gunaratna Sadavarte
आंध्र प्रदेशात राजकीय उलथापालथ; जगनमोहन सर्व मंत्र्यांचा राजीनामा घेणार

उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी जल्लोष सुरू केला आहे. सदावर्ते यांच्यामुळे आंदोलनाला यश मिळाल्याचे अनेक कर्मचारी सांगत आहेत. आता यापुढचा निर्णयही सदावर्ते जो आदेश देतील, त्यानुसार घेतला जाईल, असंही काही कर्मचाऱ्यांनी सांगितले. यावेळी अनेक महिला कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर झाले. कर्मचाऱ्यांच्या या भावनेमुळे आता संप मागे घेतला जाईल, अशी शक्यता आहे. न्यायालयाने या कर्मचाऱ्यांना 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत.

Gunaratna Sadavarte
वसंत मोरेंनी पक्षाचा वॉट्सअप ग्रुप सोडला; राज ठाकरेंकडूनही निमंत्रण नाही...

गुरूवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने कर्मचाऱ्यांना 22 एप्रिलपर्यंत कामावर हजर राहण्याचे आदेश दिले. तसेच गुन्हे मागे घेण्यासह त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करण्याचे आदेशही न्यायालयाने महामंडळाला दिले आहे. त्यामुळे आता विलीनीकरणाची मागणी निकाली निघाली आहे. या संपामुळे एकही मृत्यू आम्हाला नको आहे. सिंह आणि कोकरूच्या वादात आम्हाला कोकरूला वाचवावे लागेल, असं म्हणत न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या अधिकाधिक मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, बुधवारी झालेल्या सुनावणीवेळी न्यायालय म्हणाले होते की, एसटी कर्मचाऱ्यांना कामावरून काढू नका. पुढील चार वर्ष राज्य सरकार एसटी महामंडळ चालवेल. त्यानंतर आर्थिक निकषाच्या आधारे पुढील निर्णय घेतला जाईल, असंही न्यायालयाने म्हटलं होतं. एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने आतापर्यंत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांनी अधिवेशनादरम्यान दिलेल्या माहितीनुसार, घरभाडे भत्त्यात 7 %, 14 % 21 % वरुन 8 %, 16 % आणि 24% टक्के वाढ करण्यात आली. एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता 12 टक्क्यांवरून 28 % करण्यात आला.

Gunaratna Sadavarte
फडणवीसांनी सोमय्यांना जोड्यानं मारलं पाहिजे, तेच वकिली करताहेत ; राऊतांचा टोला

कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात सेवा कालावधीनुसार रुपये 2500, 4000 आणि 5000 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली. या वेतनवाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये सुमारे सात हजार ते नऊ हजारांपर्यंत वाढ झाली आहे. तर या वेतनवाढीमुळे महामंडळावर दरमहा रुपये 63 कोटीपेक्षा जास्तीचा भार पडणार आहे. ही पगारवाढ सातव्या वेतन आयोगाच्या जवळपास असून कर्मचाऱ्यांना नोकरीची हमी आणि पगारही दर महिन्याच्या 10 तारखेच्या आत देण्याचा निर्णय राज्य सराकरने घेतला असल्याचे अनिल परब यांनी सांगितले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com