Keshav Prasad Maurya Sarkarnama
देश

मोठी बातमी : उपमुख्यमंत्री मौर्य पराभवाच्या उंबरठ्यावर; भाजपने मतमोजणी रोखली

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य ३१ व्या फेरीअखेर सात हजार मतांनी पिछाडीवर

सरकारनामा ब्यूरो

लखनौ : उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे सराथू मतदारसंघात पराभवाच्या छायेत असून ३१ व्या फेरीअखेर ते सुमारे ६९८१ मतांनी पिछाडीवर आहेत. मतमोजणीची आणखी दोन फेरी होणे अद्याप बाकी आहे. दरम्यान, भाजप कार्यकर्त्यांनी मतमोजणी थांबवली असून त्यांनी फेरमतमोजणीची मागणी केली आहे. ईव्हीएम मशीनमध्ये गडबड केल्याची तक्रार करत भाजप (bjp) कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला, त्यामुळे मतमोजणीच्या ठिकाणी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. (UP Deputy Chief Minister Keshav Prasad Maurya trailed by 7,000 votes in 30th round)

उपमुख्यमंत्री मौर्य हे पहिल्या फेरीपासून सराथू मतदारसंघातून पिछाडीवर आहेत. या मतदारसंघात मौर्य यांना समाजवादी पक्षाच्या उमेदवार पल्लवी पटेल यांची जोरदार लढत दिली आहे. मतमोजणीच्या ३१ व्या फेरीअखेर त्या सुमारे ७ हजार मतांनी आघाडीवर आहेत. एकीकडे राज्यात भाजपने पुन्हा सत्ता मिळविली असताना मौर्य हे पिछाडीवर राहिल्याने पक्षाला मोठा धक्का मानला जात आहे.

सिराथूमध्ये सध्या केशव प्रसाद मौर्य सात हजार मतांनी पिछाडीवर आहेत. दरम्यान, ईव्हीएममध्ये गडबड झाल्याची तक्रार करत भाजप कार्यकर्त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली आहे, त्यामुळे एक तास मतमोजणी थांबवण्यात आली आहे. गोंधळ वाढल्यानंतर सपाच्या उमेदवार पल्लवी पटेल मतमोजणीच्या ठिकाणी पोचल्या आहेत. दुसरीकडे, भाजपच्या पोलिंग एजंटांनी फेरमतमोजणीची मागणी केली आहे.

सिराथू विधानसभा मतदारसंघातील मतमोजणीच्या ३१ फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. या ३१ फेऱ्यांमध्ये पल्लवी पटेल यांना १०५१२८ मते मिळाली असून उमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना ९८१४७ मते मिळाली आहेत. सपाच्या पटेल या सुमारे सात हजार मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे मौर्य हे पराभवाच्या छायेत उभे आहेत. एकीकडे योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजपने दुसऱ्यांदा सत्ता मिळविली आहे, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री मौर्य हे पराभवाच्या उंबरठ्यावर आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT