Amit Shah-Yogi Adityanath
Amit Shah-Yogi Adityanath Sarkarnama
देश

UP Election : शहा येताच बदलली रणनीती : भाजपच्या 50 आमदारांची तिकिटे वाचली

मंगेश वैशंपायन

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील (UP election 2022) पुढच्या टप्प्यातील भाजपच्या उमेदवार याद्या अंतिम करण्यासाठी आज गृहमंत्री अमित शहा (Amith Shah) यांनी योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्यासह वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली. सूत्रांच्या मते भाजप सोडून जाणाऱ्या नेत्यांची वाढती संख्या पहाता तिकीट वाटपाच्या निकषांत पक्षनेतृत्वाने काही मूलभूत बदल केले आहेत. त्यामुळे किमान ५० आमदारांची तिकिटे वाचणार असे सांगितले जात आहे. दरम्यान, भाजपने छत्रपालसिंह (बहेडी) व बहोरनलाल मौर्य (भोजीपुरा) या दोन उमेदवारांची घोषणा आज संध्याकाळी केली.

योगी आदित्यनाथ यांच्या राजवटीत ओबीसी व दलित वर्गाची वाढती नाराजी दूर करण्याच्या प्रयत्नात असलेल्या भाजप नेतृत्वाला ब्राह्मण मतपेढीही यंदा पूर्णांशाने भाजपला मतदान करणार नाही, याचे संकेत मिळत आहेत. केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी याची खुर्ची काढून घेण्याचे धाडस पक्ष दाखवत नाही. मात्र केवळ एखाद्या कलंकित मंत्र्याला वाचविणे म्हणजे १४ टक्के ब्राह्मण मतपेढीला गृहीत धरणे, असा अर्थ होत नसल्याचा संदेश या समाजाने भाजप नेतृत्वाला दिला आहे.

दरम्यान, भाजपने आपल्या तिकीट वाटपाचे निकष बदलले आहेत. त्याच वेळी पहिल्या टप्प्यात जे १०५ उमेदवार जाहीर केले त्यात उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्यासह किमान २५ उमेदवारांवर गंभीर व अतिगंभीर खटले दाखल असल्याचे पक्षाने मान्य केले आहे. राजकीय वैमनस्यातून दाखल होणारे खोटे गुन्हे हे त्याचे ठळक कारण आहे, असेही पक्षाने सांगितले आहे. आयोगाच्या नवीन निर्देशानुसार भाजपने संकेतस्थळावर गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यात उपमुख्यमंत्री मौर्य यांच्यासह बिजनौर- नजीबाबादचे कुंवर भारतेंदु सिंह, थानाभवनातील सुरेश राणा, मुजफ्फरनगरमधील कपिल देव अग्रवाल, मेरठ शहरातील उमेदवार कमल दत्त शर्मा आदींचा समावेश आहे.मौर्य हे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्या सामाजिक कामासाठी त्यांना उमेदवारी देण्यात आल्याचे भाजपने म्हटले आहे.

नवीन निकष
-सरसकट तिकीट कापणार नाहीत
-गंभीर आरोप असणाऱ्यांची तिकिटे देखील कापली जाणार नाहीत
-ब्राह्मण मतपेढीला आकर्षित करण्याची रणनीती आखणे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT