करोडोंचा गंडा घालणारा विशाल फटे 'बिग बुल' बनून आला पोलिसांसमोर!

अनेक नागरिकांना कोट्यवधींचा गंडा घालून फरार झालेला विशाल फटे (Vishal Phate) अखेर पोलिसांसमोर शरण आला आहे.
Vishal Phate Surrenders Before Solapur Police
Vishal Phate Surrenders Before Solapur Police

सोलापूर : अनेक नागरिकांना कोट्यवधींचा गंडा घालून फरार झालेला विशाल फटे (Vishal Phate) अखेर पोलिसांसमोर (Police) शरण आला आहे. सोलापूर पोलीस अधीक्षक कार्यालयात तो काल (ता.17) हजर झाला होता. त्याला अटक करण्यात आली असून, आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. मात्र, फटेने शरण येताना घातलेल्या 'बिग बुल'च्या (Big Bull) टी-शर्टची आता मोठी चर्चा होऊ लागली आहे. कारण 'बिग बुल'चा संबंध शेअर बाजार आणि त्यातील मोठ्या दलालांशी जोडला जातो.

मागील काही दिवसांपासून विशाल फटे हा काल यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून समोर आला होता. त्याने पोलिसांपुढे हजर राहणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार तो काल रात्री उशिरा सोलापूर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्यासमोर हजर झाला. त्याला अटक करण्यात आली असून, आज त्याला बार्शी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. (Vishal Phate Surrenders Before Solapur Police)

फटे हा कर्नाटकात पळून गेला होता. तेथून तो एसटी बसने सोलापुरात आला. सोलापूर बस स्थानकावरून तो रात्री आठच्या सुमारास रिक्षातून पोलिस अधीक्षक कार्यालयात पोचला. तेथील पोलिसांनी त्याला ओळखले नाही. यावर त्यानेच विशाल फटे अशी ओळख सांगितली. पोलिसांनी त्याला तातडीने ताब्यात घेऊन अटकेची कारवाई केली. फटे पोलिसांनी शरण आला त्यावेळी त्याने बिगु बुलचा टी-शर्ट घातला होता. यावरून आता मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. कारण बिग बुलचा संबंध शेअर बाजार आणि त्यातील मोठ्या दलालांशी जोडला जातो.

Vishal Phate Surrenders Before Solapur Police
राष्ट्रवादीच्या उत्तर प्रदेश प्रदेशाध्यक्षांनी भातखळकर अन् सातपुतेंना पाडलं तोंडावर

विशाल फटे याने राज्यभरातील हजारो लोकांना गंडा घातल्याची चर्चा आहे. आज चौथ्या दिवशीही फटेविरोधात तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढत आहे. आतापर्यंत सुमारे 81 तक्रारी पोलिसांत दाखल झाल्या असून, फसवणुकीचा आकडा 25 कोटी रुपयांपर्यंत पोचला आहे. मात्र, अनेकांच्या तक्रारी अजून आलेल्या नाहीत. त्यामुळे आकडा वाढण्याची चिन्हे आहेत.

Vishal Phate Surrenders Before Solapur Police
राष्ट्रवादीच्या वाट्याच्या जागेचं नेमकं काय झालं? प्रदेशाध्यक्षांनीच सांगितलं सत्य

या प्रकरणी फिर्यादी दिपक आंबुरे यांच्या फिर्यादीवरुन मुख्य सूत्रधार विशाल फटे याच्यासह पत्नी राधिका फटे, वडील अंबादास फटे, भाऊ वैभव फटे व अलका फटे (सर्वजण रा. कर्मवीर हौसिंग सोसायटी, अलिपूर रोड, बार्शी) यांच्याविरुध्द 14 जानेवारीला गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी त्याचे वडील व भावाला अटक केल्यानंतर तो पोलिसांना शरण आला. फरार झाल्यानंतर तो बंगळुरु व कर्नाटकात वास्तव्यास होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com