ajit bhadana
ajit bhadana  sarkarnama
देश

खाकी टोपी फेकून लाल टोपी परिधान ; भाजपच्या त्रासाला कंटाळून सपामध्ये प्रवेश

सरकारनामा ब्युरो

मेरठ : ''रविवारची सांयकाळ..समाजवादी पार्टीची सभा सुरू होती...एक वन अधिकारी येतो..गणवेश बदलतो, खाकी टोपी फेकून लाल टोपी परिधान करतो,'' हा सीन चित्रपटातील नसून करीमपूरच्या समाजवादी पार्टीच्या सभेतील आहे. या प्रकार बघून पंचायतीच्या सभेसाठी जमलेल्या सर्वांच्या भूवया उंचावल्या. अजित भडाना (ajit bhadana) असे या वन अधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. up election 2022 forest inspector ajit bhadana left job joins sp

भाजपच्या (bjp) दोन आमदारांच्या त्रासाला कंटाळून आपण नोकरीचा राजीनामा देत असल्याचे अजित भडाना यांनी यावेळी सभेत सांगितले. भडाना यांनी राजीनामा देऊन समाजवादी पार्टीत प्रवेश केला आहे. अजित भडाना हे मेवाडा येथील रहिवाशी असून ३५ वर्षांपासून ते वनविभागात नोकरीला होते. ते बुलंदशहराजवळील वनविभागात त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

''गुर्जर समाजातील मते मिळण्यासाठी आम्हाला पाठिंबा द्या, असा दबाब भाजपचे दोन आमदार आपल्यावर आणत होते,'' असा गंभीर आरोप अजित भडाना यांनी यावेळी केला. ''आपण त्यांच्या या दबावाला भीक घातली नाही, म्हणून त्यांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली,'' असा आरोप भडाना यांनी केला आहे.

भाजप सरकार गरीब आणि नोकरदारांना त्रास देत आहेत. त्यांच्या त्रासाला कंटाळून मी राजीनामा देत असल्याचे या वन अधिकाऱ्याने सांगितलं. त्यांनी सपात प्रवेश केला तेव्हा सपाचे माजी आमदार व सध्याचे उमेदवार योगेश वर्मा उपस्थित होते.

''भाजपचे नेता अशोक कटारिया यांचा मला फोन आला. त्यांनी मला विचारले की मत कोणाला देणार, मी म्हटलं की तुमचे आमदार मला शिव्या देतात, तर मी त्यांना मत कसे देऊ? भाजपचे नेते दिनेश खटीक आणि संगीत सोम यांनीही मला धमकी दिली आहे,'' असे अजित भडाना यांनी सांगितलं.

''अजित भडाना यांनी त्यांचा राजीनामा व्हाटस्अॅप पाठविला आहे. त्यांनी राजकीय पक्षात प्रवेश केला असल्याचे समजते. या व्हिडिओ बाबत त्यांना स्पष्टीकरण देण्यास सांगितलं आहे, राजीनामा आणि व्हिडिओ वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविण्यात आला आहे. पुढील कारवाई वनविभाग करणार आहे,'' असे बुलंदशहर वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी विनीता सिंह यांनी माध्यमांना सांगितलं

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT